r ashwin record at chepauk as chennai's wicket is spin friendly india vs australia world cup match  Saam tv news
Sports

India vs Australia: ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही! टीम इंडियाचा हा खेळाडू कांगारूंना चेपॉकमध्ये नाचवणार

R Ashwin Record At Chepauk: भारतीय संघातील हा खेळाडू ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाचवू शकतो.

Ankush Dhavre

India vs Australia, World Cup 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेलान ५ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. तर खऱ्या अर्थाने वर्ल्डकप स्पर्धेची सुरूवात आजपासून होणार आहे.

कारण भारतीय संघ आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. चेपॉकच्या मैदानावर हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात भारतीय संघातील असा एक खेळाडू आहे जो ऑस्ट्रेलियाला आपल्या गोलंदाजीवर नाचवू शकतो.

हा गोलंदाज ऑस्ट्रेलियासाठी ठरू शकतो धोकादायक..

भारत आणि ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्डकप सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. सामना जसजसा पुढे जातो, तशी खेळपट्टी स्लो होत जाते त्यामुळे फिरकी गोलंदाजांना विकेट्स मिळायला सुरूवात होते.

या सामन्यासाठी भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो. या सामन्यासाठी कुलदीप यादव,रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांना संधी दिली जाऊ शकते. आर अश्विनला अक्षर पटेलची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे.

तो गेले काही महिने वनडे क्रिकेटपासून दुर असला तरीदेखील त्याला चेपॉकच्या मैदानावर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. याच अनुभवाचा फायदा घेत तो चेपॉकच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाचवू शकतो.

चेपॉकच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला तर, आर अश्विनने या मैदानावर आतापर्यंत ३ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५ गडी बाद केले आहेत. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने चेपॉकच्या मैदानावर बरेच सामने खेळले आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना देखील त्याने या मैदानावर बरेच सामने खेळले आहेत. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT