James anderson and r ashwin
James anderson and r ashwin Twitter
क्रीडा | IPL

ICC Rankings: जेम्स अँडरसनने आपली बादशाहत पुन्हा मिळवली; अश्विनसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी विराजमान

Ankush Dhavre

ICC Test bowling ranking: भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनचे नुकताच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीत मोठे नुकसान झाले आहे. तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आर अश्विनसह संयुक्तरित्या पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.

आर अश्विन गेल्या आठवड्यात आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता.

आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. दोन्ही डावात मिळून त्याने केवळ ४ गडी बाद केले होते. त्यामुळे नुकताच जाहीर करण्यात आलेल्या यादीत आर अश्विनला ६ गुणांचा फटका बसला आहे.

या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. (Latest sports updates)

अश्विन आणि अँडरसन या दोघांचे रेटिंग पॉईंट्स ८५९ आहेत. जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनण्यासाठी स्पर्धा वाढत चालली आहे. जेम्स अँडरसन आणि आर अश्विनला टक्कर देण्यासाठी पॅट कमिन्स, कागिसो रबाडा आणि नॅथन लायन सारखे गोलंदाज देखील शर्यतीत आहेत.

पॅट कमिन्सने वैयक्तिक कारणास्तव बॉर्डर गावसकर ट्रॉफीतून माघार घेतली आहे. तो ८४९ रेटिंग पॉईंटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिजविरुध्द ८ गडी बाद करणारा ८०७ रेटिंग पॉईंटसह चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे.

तर जोरदार फॉर्ममध्ये असलेला नॅथन लायन नवव्या स्थानी पोहोचला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malshejh Ghat Accident News: माळशेज घाटात भीषण अपघात! दूध टँकर आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई! अनेक गावातील अवस्था अत्यंत बिकट

Onion Price Hike: शेतकऱ्यांना अच्छे दिन! निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वधारले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका दर

Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Today's Marathi News Live : सांगलीत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT