r ashwin twitter
Sports

R Ashwin Record: 1 विकेट घेताच अश्विन बनला एशियाचा किंग! मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गजाला सोडलं मागे

IND vs BAN, R Ashwin Record: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनने मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गज खेळाडूला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

R Ashwin Record News: कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

अश्विनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

आर अश्विन हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय संघासाठी हुकमी एक्का आहे. अश्विनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक गडी बाद केले आहेत. दरम्यान कानपूरच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १ विकेट घेताच तो आशियातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. अश्विन हा आशियामध्ये खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

तर झाले असे की, भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाकडून २९ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार नजमूल शांतो सेट झाला होता. मात्र अश्विनने त्याला ३१ धावांवर पायचित करत माघारी धाडलं. हा अश्विनचा आशियामध्ये खेळताना ४२० वा बळी ठरला आहे. यापूर्वी आशियात गोलंदाजी करताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा अनिल कुंबळे यांच्या नावे होता. अनिल कुंबळे यांनी ४१९ गडी बाद केले होते. या यादीत सर्वोच्च स्थानी मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६१२ गडी बाद केले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज (आशिया)

मुथय्या मुरलीधरन- ६१२ गडी

आर अश्विन - ४२० गडी*

अनिल कुंबळे- ४१९ गडी

रंगना हेरथ - ३५४ गडी

हरभजन सिंग - ३०० गडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT