PBKS vs RR x ipl
Sports

PBKS vs RR: हेटमायरचा 'विजयी' षटकार; ३ विकेट राखत राजस्थान रॉयल्सचा विजय

Punjab Kings vs Rajasthan Royals : आयपीएलच्या २७व्या सामन्यात पंजाब किंग्जसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला.

Bharat Jadhav

Punjab Kings vs Rajasthan Royals IPl 2024 :

चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा ३ धावांनी विजय झाला. या विजयासह राजस्थान संघाने ६ सामन्यांमध्ये ५ विजय मिळवलेत. प्रथम फलंदाजी करत पंजाबच्या संघाने राजस्थान रॉयल्स संघासमोर माफक १४८ धावांचे आव्हान दिलं होतं. परंतु हे आव्हान पार करताना राजस्थान संघाच्या फलंदाजाचा घाम फुटला होता.

अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्याने अनेकांची धकधक वाढवली होती. पंजाबने दिलेलं माफक आव्हान राजस्थान संघासाठी खूप कठीण ठरलं. सुरुवात चांगली करूनही राजस्थान संघाची विजयाच्या शिखर चढताना दमछाक झाली. हेटमायरच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने ३ विकेट राखत विजय मिळवलाय. हेटमायरने अवघ्या १० चेंडूत २७ धावा चोपल्या. हेटमायरच्या २७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर राजस्थानने १९.५ षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या आणि सामना ३ गडी राखून जिंकला. हेटमायरला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने ३९ तर तनुष कोटियनने २४ धावा केल्या. संघासाठी कर्णधार संजूने १८ धावांचे योगदान दिले तर रियान परागने २३ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचे शेर चांगला खेळ करण्यात अपयशी ठरले. पंजाबच्या संघाने २० षटकांत ८ विकेट गमावत १४७ धावा केल्या. पंजाबकडून सॅम करन आणि कागिसो रबाडा यांनी २-२ तर अर्शदीप सिंग, लियान लिव्हिंगस्टोन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तर पंजाब संघाकडून फलंदाजी करताना आशुतोष शर्माने ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात पंजाब संघाने ८ बाद १४७ धावा केल्या. पंजाबच्या संघाकडून अथर्व तायडे आणि बेअरस्टो यांनी प्रत्येकी १४ धावांची तर प्रभसिमरन सिंगने १० धावांची खेळी खेळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT