Sports

PBKS vs KKR: पंजाबची फलंदाजी ढेफाळली; Knights पुढे किंग्स ढेर, कोलकातासमोर माफक आव्हान

PBKS vs KKR : पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आमनेसामने आले आहेत. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bharat Jadhav

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु केकेआरच्या फिरकीपुढे किंग्स पूर्णपणे ढेर झाले. पंजाबचा संपूर्ण संघ १११ धावांवर बाद झाला. पंजाबच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. पण त्यांच्या नंतरच्या फलंदाज अपयशी ठरले. कोलकाताला विजयासाठी ११२ धावा करायच्या आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात चांगली झाली. प्रियांश आर्यनेही चांगले शॉट्स खेळले. पण चौथ्या षटकात प्रियांश आर्यला हर्षित राणाने बाद केलं. आर्यने २२ धावा केल्या. प्रियांश आर्य बाद झाल्यानंतर एकानंतर एक विकेट जात राहिल्याने पंजाबची स्थिती अत्यंत वाईट होती. कर्णधार श्रेयस अय्यर देखील या सामन्यात अपयशी ठरला.

अय्यरही खाते न उघडता बाद झाला. यानंतर, पुढच्या षटकात जोश इंगलिसही बाद झाला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात प्रभसिमरन सिंगही बाद झाला. त्याने फक्त ३० धावा केल्या. नवव्या षटकात नेहल वधेराही १० धावा काढून बाद झाला. पंजाब आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत ३३ सामने खेळले गेले आहेत. या काळात केकेआरचा वरचष्मा होता. केकेआरने २१ सामने जिंकले. त्याच वेळी, पीबीकेएसला फक्त १२ सामन्यांमध्ये विजय मिळाला.

कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग ११

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, लवनिथ सिसौदिया, व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, मोइन अली, रमनदीप सिंह, आंद्रे रसेल, एनरिक नॉकिया, वैभव अरोड़ा, मयंक मारकंडे, स्पेंसर जॉनसन, हर्षित राणा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती और चेतन सकारिया, क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक ), अंगकृष रघुवंशी, रोवमैन पॉवेल, मनीष पांडे

पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग ११

श्रेयस अय्यर (कर्णधार), विशाक विजयकुमार, यश ठाकुर, हरप्रीत बराड़, विष्णु विनोद, मार्को जानसन, लॉकी फर्ग्यूसन, जोश इंगलिस, जेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, आरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्लाह उमरजई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT