pro kabaddi saam tv news
Sports

Pro Kabaddi Season 10: शेवटच्या मिनिटात यु मुंबाचं जोरदार कमबॅक! हरियाणाविरुद्धची लढत टाय

U Mumba vs Haryana Steelers : प्रो कबड्डीच्या दहाव्या हंगामातील मुंबई लेगचा शेवटचा सामना यु मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

Pro Kabaddi News In Marathi:

प्रो कबड्डीच्या दहाव्या हंगामातील मुंबई लेगचा शेवटचा सामना यु मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जयदीप दहीयाच्या ८ पकडींबरोबरच चढाईत १४ गुण मिळवणारा आमीर मोहम्मद जाफर दानिश हे दोघे सामन्याचे मुख्य आकर्षण ठरत असताना हा सामना ४४-४४ असा बरोबरीत सुटला.

एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत हरियाणा स्टिलर्सने अतिशय वेगवान प्रारंभ करताना जयदीप दहियाच्या पकडीमुळे यु मुंबावर सातव्याच मिनिटाला पहिला लोन चढवून ११-६ अशी आघाडी घेतली.पिछाडीवर असलेल्या यु मुंबाने आमीर मोहम्मद जाफर दानिशच्या चढाया आणि सिध्दार्थ देसाईच्या सुपर रेडने सावरले व त्यांची पिछाडी मध्यंतराला केवळ तीन गुणांवर आणली. (Latest sports updates)

मध्यंतरानंतर मात्र, हरियाणा स्टिलर्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया आणि सुपर टॅकलच्या साहाय्याने आपली आघाडी ९ गुणांवर नेली. यु मुंबा संघाने सावध खेळ करताना टप्प्याटप्याने गडी बाद करत हरियाणा स्टिलर्सवर पहिला लोन चढवित ३०-३० अशी बरोबरी साधली.

मात्र, पूर्वीप्रमाणेच हरियाणा स्टिलर्सने झटपट पुनरागमन करताना यु मुंबावर लोन चढवून पुन्हा ५ गुणांची आघाडी मिळवली. सामन्याचा निकाल स्पष्ट होत असतानाच यु मुंबा संघाने हरियाणा स्टिलर्सवर दुसरा लोन चढवून केवळ ४० सेकंद बाकी असताना ४४-४४ अशी बरोबरी साधली. उरलेल्या वेळात ही कोंडी फुटू शकली नाही. त्यामुळे ही लढत बरोबरीतच संपली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT