प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामात एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटन आणि पटना पायरेट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
या सामन्यात पुणेरी पलटनने जबरदस्त खेळ करत ४६-२८ ने पराभव केला आहे. पुणेरी पलटनचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. या शानदार कामगिरीसह पुणेरी पलटनचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे हा पटनाचा सलग चौथा विजय आहे. या पराभवासह पटनाचा संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानी आहे.
पुणेरी पलटनकडून चढाई करताना पंकज मोहिते चमकला. त्याने या सामन्यात चढाईत सर्वाधिक १० गुणांची कमाई केली. तर बचाव करताना अबिनेश नादराजनने सर्वाधिक ५ गुणांची कमाई केली. तर पटना पायरेट्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, पटनाकडून एम सुधाकरने चढाईत ५ गुणांची कमाई केली. तर सचिनने बचाव करताना ४ गुणांची कमाई केली. (Latest sports updates)
प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामात पुणेरी पलटनचा जलवा कायम..
पुणेरी पलटनचा संघ या स्पर्धेत दमदार खेळ करताना दिसून येत आहे. पहिल्या हाल्फच्या समाप्तीनंतर पुणेरी पलटनचा संघ गुणतालिकेत २२-१५ ने आघाडीवर होता. पुणेरी पलटन संघाकडून अस्लम इनामदार आणि पंकज मोहिते चढाईत चमकले.
तर दुसऱ्या हाल्फच्या सुरुवातीलाच पुणेरी पलटनच्या बचावपटूंनी सचिन, मंजीत दहीया आणी एम सुधाकरची यशस्वी पकड केली. या पकडच्या बळावर पटनाचा संघ ऑलआऊट होण्याच्या वाटेवर होता. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून आलेल्या संदिप कुमारने बोनस घेत पटनाला दिलासा दिला.
या सामन्यातील २४ व्या मिनिटाला पुणेरी पलटनने पटना पायरेट्सला दुसऱ्यांदा ऑलआऊट केलं. पुणेरी पलटनच्या मजबुत बचावाने पटनाच्या चढाईपटूंना सळो की पळो करुन सोडलं होतं. त्यामुळेच पटनाचा संघ या सामन्यात कमबॅक करु शकला नाही. शेवटी पुणेरी पलटनने या सामन्यात ४६-२८ ने विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.