pro kabaddi  saam tv news
Sports

Pro Kabaddi Season 10: पुणेरी पलटणची बंगाल वॉरियर्सवर मात; हरियाणा स्टीलर्सचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा

Puneri Paltan vs Bengal Warriors: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने बंगाल वॉरियर्स संघाचा 29-26 असा पराभव केला आहे.

Ankush Dhavre

Puneri Paltan vs Bengal Warriors, Kabaddi News Marathi:

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने बंगाल वॉरियर्स संघाचा 29-26 असा पराभव केला आहे. यासह बंगाल वॉरियर्स संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे.

कोलकत्ता नेताजी सुभाषचंद्र इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत बंगाल वॉरियर्स संघाला गुण तालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पुणेरी पलटण संघाकडून शेवटच्या क्षणी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

या पराभवामुळे बंगाल वॉरियर्सच्या प्लेऑफ साठी पात्र ठरण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहे. बंगालच्या पराभवाचा फायदा हरियाणा स्टीलर्स संघाला होणार आहे. कारण केवळ एक सामना जिंकून हरियाणाचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो.

पुणेरी पलटण संघाने आक्रमक सुरुवात करत सहाव्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सवर पहिला लोन चढवून 9-1 अशी आघाडी घेतली. आकाश शिंदेच्या सुपर रेडमुळे पुणेरी पलटण संघाची आघाडी 14-2 अशी झाली.

एकाबाजूला पुणेरी पलटण संघ आपल्या आक्रमण व बचावात गुण मिळवत असताना दुसरीकडे बंगाल वॉरियर्सला सुर गवसत नव्हता. आकाश शिंदेने हर्ष लाडची सुपर टॅकल करून बंगाल वॉरियर्सवर दुसरा लोनही चढवला. बंगालच्या मनिंदरने पूर्वार्धात काही गुण मिळवून ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्धात पुणेरी पलटण संघ 18-9 अशा फरकाने आघाडीवर होता. (Sports news in marathi)

उत्तरार्धात मात्र बंगाल वॉरियर्स संघाने जोरदार कमबॅक करत पहिल्या पाच मिनिटात पुणेरी पलटण संघावर पहिला लोन चढविला. नितिन कुमारने केलेल्या सुपर रेडमुळे पंकज मोहिते व तुषार आधवाडेला बाद करून आघाडी कमी केली. त्यामुळे सामन्यात आणखी चुरस निर्माण झाली.

दोन्ही संघामध्ये चुरस सुरू असताना अखेरच्या मिनिटाला आकाश शिंदेने पुन्हा पुणेरी पलटण संघाला गुण मिळवून देत बंगाल वॉरियर्सला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही व पुणेरी पलटण संघाने हा सामना 29-26 असा जिंकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT