Mumbai Cricket Team x
Sports

Cricket : यशस्वी जैस्वाल नाही तर 'हा' खेळाडू सोडणार मुंबई संघाची साथ, MCA ला पत्र लिहित म्हणाला...

Mumbai Cricket Team : यशस्वी जैस्वालने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याने यूटर्न घेत निर्णय बदलला. आता दुसऱ्या एका खेळाडूने मुंबईचा संघ सोडण्याचा निर्धार केला आहे.

Yash Shirke

एकेकाळी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा अशा दिग्गज खेळाडूंशी ज्याची तुलना केली जात होती, तो खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ. पृथ्वी मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. जुलै २०२१ मध्ये तो भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलमध्ये त्याच्यावर कुणी बोली लावली नव्हती. पृथ्वी शॉ सध्या फक्त देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे.

पृथ्वी शॉचा देशांतर्गत क्रिकेटमधीलही फॉर्म फारसा चांगली नाही. त्यांच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. पृथ्वी रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी अशा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतो. पण आता पृथ्वी शॉ मुंबईच्या संघाला अलविदा म्हणू इच्छित आहे. दुसऱ्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्याने त्याने मुंबईचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पृथ्वी शॉने आगामी देशांतर्गत स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएकडे एनओसी जारी करण्याची विनंती केली आहे. एमसीएला पृथ्वीने पत्र देखील लिहिले आहे. 'माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला दुसऱ्या राज्य संघाकडून खेळण्याची चांगली संधी मिळाली आहे, तेव्हा मला एनओसी द्यावे अशी मी विनंती करतो' असे त्याने पत्रामध्ये लिहिले आहे.

मागच्या वर्षी फिटनेसच्या कारणावरुन पृथ्वी शॉला मुंबई संघातून वगळण्यात आले होते. पृथ्वीचे वजन जास्त आहे, त्याच्या शरीरात ३५ टक्के चरबी आहे, असे संघ व्यवस्थापनाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले होते. त्यानंतर पृथ्वीला फिट होण्याची, वजन कमी करण्याची ताकीद देण्यात आली. पण त्याने सुधारणा न केल्याने निवड समितीने त्याला विजय हजारे ट्रॉफी २०२४ मध्ये संघातून बाहेर ठेवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT