prithvi shaw twitter
Sports

Prithvi Shaw : अखेर पृथ्वी शॉचा संघ ठरला, ऋतुराजसोबत सलामीला उतरणार

Prithvi Shaw Leaves Mumbai, Joins Ruturaj’s Maharashtra Side : पृथ्वी शॉ याचा महाराष्ट्र संघात प्रवेश; ऋतुराजसोबत रणजी हंगामात सलामीला उतरणार, रोहित पवार यांनी स्वागत केलं, मुंबई संघाला दिला रामराम.

Akshay Badve

Prithvi Shaw Joins Maharashtra Team : मुंबईच्या रणजी संघाला रामराम करणाऱ्या पृथ्वी शॉ याला अखेर क्रिकेट संघ मिळाला आहे. आगामी रणजी हंगामापासून पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघातून खेळताना दिसणार आहे. ऋतुराज गायकवाड याच्यासोबत पृथ्वी शॉ सलामीला उतरणार आहे. पृथ्वीच्या येण्याने महाराष्ट्राची ताकद आणखी वाढली आहे. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पृथ्वी शॉ याचे महाराष्ट्राच्या संघात स्वागत केले.

भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि युवा स्टार पृथ्वी शॉ याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निरोप घेत, आगामी हंगामापासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाची ताकद यामुळे अधिक बळकट होणार आहे. पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने सातत्यपूर्ण व भरीव कामगिरी करत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ साली अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३ शतके आणि ४५०० हून अधिक धावा आहेत.

पृथ्वी शॉ काय म्हणाला ?

कारकिर्दीतील या वळणावर मी एक क्रिकेटपटू म्हणून स्वतःची वाढ आणि विकासासाठी महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आजवर मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यभर विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमन्स एमपीएल, कॉर्पोरेट शील्ड, डी. बी. देवधर ट्रॉफी यांसारखे उपक्रम ही त्याची साक्ष आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की, अशा प्रेरणादायी वातावरणात खेळल्याने माझ्या कारकिर्दीला नवे वळण मिळेल व क्रिकेटपटू म्हणून अधिक प्रगती करू शकेन. तसेच ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुर्बानी आणि मुकेश चौधरी यांसारख्या गुणवान खेळाडूंसोबत महाराष्ट्र संघात खेळण्याची संधी मिळेल, याचा मला आनंद आहे, असे पृथ्वी शॉ म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : ९ जुलैला भारत बंद! मुंबईत शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार? काय सुरु असणार?

Viral Video: चक्क पोलिसांकडून चोरी! जनरल डब्यातील झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास केला, VIDEO व्हायरल

Nagpur News : नागपूरच्या १२ वर्षीय जयेशचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Dada bhuse : शालेय शिक्षण मंत्र्यांची 'दादा' गिरी; बंद पडलेल्या मराठी शाळेत कार्यालय थाटण्याचा प्रस्ताव

Maharashtra Live News Update : राज ठाकरे मीरारोडला जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT