Funny Moments In Cricket: भारतीय संघातील युवा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ हा भारतीय संघात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. संघात कमबॅक करण्यासाठी तो इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कांऊटी चॅम्पियनशीप स्पर्धेत खेळताना दिसून येत आहे.
मात्र पहिल्याच सामन्यात तो पुर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने नॉर्थहॅम्पशायर संघाकडून रॉयल लंडन कप स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
नॉर्थहॅम्पशायर संघाकडून पदार्पण करताना पृथ्वी शॉला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पदार्पणाच्या सामन्यात त्याला बाऊंसर चेंडूचा सामना करताना नतमस्तक व्हावं लागलं आहे. ग्लॉस्टरशायर संघातील गोलंदाज पॉल वॅन मीकरनने भन्नाट गतीने बाऊंसर चेंडू टाकला ज्यावर पृथ्वी शॉचा तोल गेला आणि त्याने स्वत: बॅट स्टंपला मारून घेतली.
पॉल वॅन मीकरनने टाकलेल्या भन्नाट गतीच्या चेंडूवर पृथ्वी शॉने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला.
चेंडू वाऱ्याच्या वेगाने यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हमध्ये गेला. मात्र पुल शॉटच्या प्रयत्नात असलेल्या पृथ्वी शॉचा तोल गेला आणि तो मैदानावर आपटला. पृथ्वी शॉला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात केवळ ३४ धावा करता आल्या. (Latest sports updates)
सराव सामन्यात अर्धशतक..
कांऊटी चॅम्पियनशीपमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पृथ्वी शॉला सराव सामना खेळण्याची संधी मिळाली होती. इंट्रा स्क्वाड सामन्यात पृथ्वी शॉने स्टीलबॅक्स विरूद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली.
त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ६५ धावांची खेळी केली होती. भारतीय संघात कमबॅक करू पाहणाऱ्या पृथ्वी शॉला आयपीएल २०२३ स्पर्धेतही हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी देखील त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.