Pragyan Ojha and Ramesh Powar BCCI
Sports

BCCI ची मोठी घोषणा; आगरकरनंतर २४ कसोटी सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूवर निवड समिती प्रमुखपदाची जबाबदारी

Pragyan Ojha appointed as BCCI chief selector : अजित आगरकरनंतर निवड समिती प्रमुख कोण होणार? अशी प्रश्नार्थक चर्चा आहे. पण आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा याची निवड समिती प्रमुखपदी निवड केली आहे. रमेश पोवार याचाही निवड समितीत सदस्य म्हणून समावेश केला आहे.

Nandkumar Joshi

New chief selector of Indian cricket team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय संघाच्या निवड समितीत मोठा फेरबदल केला आहे. अजित आगरकर याचा कार्यकाळ संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा याची निवड समितीच्या प्रमुखपदी निवड केली आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या अनुभवाच्या निकषावर ओझा याची ही निवड केली आहे. आता तो अजित आगरकरची जागा घेणार आहे. माजी क्रिकेटपटू रमेश पोवार याचीही निवड समितीत सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांनी निवड समिती सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. या दोघांनीही मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात सर्व अर्जांची पडताळणी आणि मुलाखती घेतल्यानंतर सर्वसंमतीने रमेश पोवार याची निवड समिती सदस्य म्हणून निवड केली.

भारताकडून फक्त दोन कसोटी सामने, निवड समितीत नियुक्ती

रमेश पोवार यानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताकडून दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. ३१ वनडे सामने देखील खेळला आहे. त्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक पदांवर काम केले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ, मुंबई आणि गुजरातचा हेड कोच, तसेच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सिलेन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघासोबतच्या कार्यकाळात संघानं आशियाई चषक, कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक मिळवले आहे.

प्रज्ञान ओझा चीफ सिलेक्टर

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीची धुरा आता प्रज्ञान ओझा याच्याकडे असेल. तसेच या समितीत शिवसुंदर दास, आरपी सिंह, अजय रात्रा, रमेश पोवार हे सदस्य म्हणून काम पाहतील. संघासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड, सामन्यांच्या गरजेनुसार, योग्य संघाची निवड करण्याची जबाबदारी या समितीवर असेल. खेळाडूंची कामगिरी आणि संघाची गरज लक्षात घेऊन योग्य आणि निष्पक्ष निर्णय घेण्याची जबाबदारी ओझाच्या नेतृत्वात निवड समितीला पार पाडावी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अजित आगरकरचं बीसीसीआयकडून कौतुक

बीसीसीआयकडून निवड समितीचा माजी प्रमुख अजित आगरकर याच्या कार्याचं कौतुक केलं. त्याची मेहनत आणि योगदानासाठी आभार मानले. आगरकर याची २०२३ मध्ये निवड समिती प्रमुख म्हणून निवड केली होती. त्याच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघानं मोठं यश मिळवलं आहे. भारतानं तीन आयसीसी ट्रॉफी, दोन आशिया चषक आणि सलग दुसऱ्यांदा एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मेघना बोर्डीकर यांच्या नारी शक्ती संवाद यात्रेचा माहूर गडावर समारोप

ताटातील भाकरी महागणार! ज्वारीचा भाव शंभरीपार, नवीन रेट काय?

Bank Holiday: २० ऑक्टोबरला बँका सुरू राहणार की बंद? लगेच चेक करा RBI ची यादी

'बॅग हिसकावली, कागदपत्रे गायब केली'; राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंवर मारहाणीचा आरोप, राजकारणात खळबळ

Black Hair Colour Tips: आयुष्यभर केस राहतील काळे, कढीपत्याच्या पानांचा तेलाने करा मालिश

SCROLL FOR NEXT