Pornstar kendra Lust Appreciates to Mohammed Shami's Bowling Saam TV
Sports

IPL 2022: मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर फिदा झाली 'ही' अमेरिकन अडल्ट स्टार, म्हणाली...

IPL 2022 LSG vs GT Latest News: केंड्रा लस्टचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होतयं आणि तिच्या या ट्विटवर चाहत्यांकडून गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: इंडियन प्रीमीअर लीग अर्थात आयपीएल २०२२ (IPL 2022) चा हंगाम सुरु झाला आहे. यंदा १० संघ आयपीएलमध्ये खेळतायत. जगातलं सर्वात मोठं क्रिकेट लीग असल्यानं आणि जगभरातल्या संघांमधून खेळाडू सहभागी होत असल्यानं आयपीएलचे जगभरात फॅन्स आहेत. आयपीएलच्या या सीजनचा चौथा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात झाला. यात बॉलर मोहम्महद शमी (Mohammed Shami) याने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे गुजरात संघाचा दणदणीत विजय मिळाला. या विजयानंतर मोहम्मद शमीला चाहत्यांकडून भरभरुन शुभेच्छा आल्या. यात एक नाव खास होतं, ते म्हणजे अमेरिकेची प्रसिद्ध अडल्ट स्टार (Pornographic Film Actor) केंड्रा लस्ट (Kendra Lust).

हे देखील पहा -

लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने अतिशय रोमांचक विजय मिळवला. गुजरातच्या या विजयाचा हिरो ठरला तो मोहम्मद शमी. शमीने 4 षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले. या शानदार कामगिरीसाठी मोहम्मद शमीला सामनावीर (MAN OF-THE-MATCH) म्हणून गौरवण्यात आलं. या कामगिरीनंतर शमी चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, अमेरिकन पॉर्नस्टार केंड्रा लस्टलाही त्याच्या गोलंदाजीने आकर्षित केलं आहे. केंड्रा लस्टने सोशल मीडियावर शमीसाठी खास संदेश लिहिला आहे. केंड्रा लस्टने शमीला ट्विटरवर (Twitter) टॅग केले आणि लिहिले, 'खूप उत्कृष्ट कामगिरी मोहम्मद शमी.' असं म्हणत तिने शमी याचं कौतुक केलं.

चाहत्यांनी घेतली फिरकी -

केंड्रा लस्टचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होतयं आणि तिच्या या ट्विटवर चाहत्यांकडून गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने मीम शेअर केला आहे ज्यावर लिहिलयं की, 'भाई लगता है आपके प्यार में गिर गई है.' 'दुसऱ्या युजरने लिहिले, 'क्रिकेटचा उल्लेख करताना मी पाहिलेली तू पहिली अमेरिकन असेल!' असा शेकडो मजेशीर कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मोहम्मद शमीबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्सकडून खेळण्यापूर्वी शमी पंजाब संघात होता. यावेळी लिलावात गुजरातने शमीला विकत घेतले होते. शमी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.

केंड्रा लस्ट कोण आहे (Who Is Kendra Lust)?

केंड्रा लस्ट 43 वर्षांची अमेरिकन पॉर्नस्टार आहे आणि ती अमेरिकेसह जगभरात प्रसिद्ध आहे. ती अडल्ट फिल्म्सचं दिग्दर्शनही करते. तसचं केंड्राला वेबकॅम मॉडेल म्हणूनही ओळखलं जातं. केंड्रा 2012 पासून अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. तिला बॉलीवूडवरही खूप प्रेम आहे. त्यामुळे केंड्रा लस्टने यापूर्वी सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज चित्रपट कलाकारांबाबतही सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT