pro kabaddi 2023 X/pro kabaddi
Sports

PKL 2023, Patna vs Gujarat: पटनाचा शेवटच्या मिनिटात थरारक विजय! होम ग्राऊंडवर गुजरातला चारली पराभवाची धूळ

Pro Kabaddi 2023: प्रो कबड्डी २०२३ लीग स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात पटना पायरेट्स संघाने दमदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

Gujarat Giants vs Patna Pirates, Pro Kabaddi 2023:

प्रो कबड्डी २०२३ लीग स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात पटना पायरेट्स संघाने दमदार विजय मिळवला आहे. हा सामना जिंकून पटना पायरेट्स संघाने गुजरात जायंट्स संघाची विजयाची साखळी तोडली आहे. या सामन्यात पटना पायरेट्सने ३३-३० ने बाजी करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुजरातला आपल्या होम लेगच्या शेवटच्या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही.

या सामन्यात गुजरात जायंट्स संघाकडून राकेशने चढाई करताना सर्वाधिक ११ गुणांची कमाई केली. तर बचाव करताना सोमवीरने सर्वाधिक ५ गुणांची कमाई केली. पटना पायरेट्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, सचिन, संदीप आणि सुधाकरने ४-४ गुणांची कमाई केली. तर बचाव करताना नीरज कुमार आणि अंकितने ४-४ गुणांची कमाई केली.

पहिल्या हाल्फच्या समाप्तीनंतर दोन्ही संघ १२-१२ च्या बरोबरीत होते. सुरुवातीला पटना पायरेट्स संघाचं पारडं जड होतं . गुजरातचा संघ लवकरच ऑल आऊट होणार होता. मात्र पटना संघातील चढाईपटू सुधाकर सेल्फ आऊट झाला.

त्यामुळे गुजरातला गुण मिळाले आणि इथून गुजरातने पटनाला पुढे जाण्याची संधीच दिली नाही. हाल्फ टाईमच्या समाप्तीनंतर सुरुवातीच्या १० मिनिटात पटनाने १३ गुणांची कमाई केली. तर गुजरातला केवळ २ गुण मिळवता आले. (Latest sports updates)

या सामन्यातील ३७ व्या मिनिटाला पटनाचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. गुजरातकडून सोमवीरने हाय फाय पू्र्ण केलं. तर राकेशने सुपर १० पूर्ण केलं. या दोघांच्या कामगिरीमुळे गुजरातने सामन्यात कमबॅक केलंय मात्र शेवटच्या मिनिटात राकेश चुकीच्या वेळी बाद झाला. त्यामुळे गुजरातच्या हातून हा सामना निसटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT