BANGLADESH TEST CRICKETER NAEEM HASAN ALLEGES POLICE ASSAULT AFTER MATCH saam tv
Sports

गाडी अडवली, कॉलर पकडली, खेचत नेलं...; टेस्ट क्रिकेटरला पोलिसांकडून बेदम मारहाण

Police Beaten Test Cricketer On Road: कसोटी क्रिकेटपटू पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडी अडवून क्रिकेटरला खाली उतरवून त्याला पोलिसांनी मारल्याची चर्चा आहे.

Bharat Jadhav

  • बांगलादेशचा कसोटी क्रिकेटपटू नयिम हसन याने पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला.

  • गाडी अडवून कॉलर पकडत खेचत नेल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.

  • ढाका प्रीमियर लीगचा सामना खेळून परतत असताना घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

बांगलादेशचा टेस्ट खेळाडू आणि ऑफ स्पिनर नयिम हसन याला पोलिसांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी कसोटी क्रिकेटपटूला रात्री गाडीतून उतरवून त्याची कॉलर पकडून त्याला खेचत त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत बांगलादेश तपास यंत्रणेकडून ऑफ स्पिनर नयिम हसनला त्रास देत असल्याचा आरोप केला जातोय. शनिवारी नयिम हसन याच्या मूळ गावी चित्तगोंग येथे नयिम हसन याला तपास यंत्रणांनी त्रास दिल्याचा दावा केला जातोय.

ढाका येथील बीकेएसपी येथे 12 जून रोजी ढाका प्रीमियर लीग स्पर्धेत नयिमने प्राईम बँक क्रिकेट क्लबसाठी आपला शेवटचा सामना खेळला. सामना संपल्यानंतर घरी परत येत असताना रात्री पोलिसांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली. नयिम याची झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टेस्ट सीरिजसाठी निवड झाली आहे. मारहाण केल्यानंतर नयिमला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि त्यानंतर सोडून दिलं गेलं, पण या घटनेचे वर्णन करत असताना नयिम घाबरलेला दिसत होता.

या घटनेप्रकरणी बोलताना क्रिकेटपटू म्हणाला की, माझा प्रीमियर लीगचा सामना सुरू होता, माझ्या विमानाला उशीर झाला होता. मी विमानतळावरून माझ्या सीएनजीने येत होतो, तेव्हा रात्री 11.25 च्या सुमारास लंकन बाजार फ्लायओव्हरखाली माझी सीएनजी थांबवली आणि चालकाकडून कागदपत्रे घेतली', असं नयिमने सुटका झाल्यानंतर सांगितलं.

'मी पोलिसांना माझी बॅग तपासू शकता, असं सांगितलं, पण त्यांनी माझा गळा पकडला. गाडीत बस असं म्हणून गाडीत नेलं. तुम्ही गळा का पकडला? असा प्रश्न त्यांना विचारला, पण यानंतर त्यांनी मला बाहेर ढकललं मग त्यांनी मला पुन्हा पकडलं, मारहाण केली असा आरोप नयिमनने केला आहे.

दरम्यान पोलीस मारहाण करत असताना त्याने आपण एक राष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याचं सांगितलं. टेस्ट क्रिकेटमध्ये मी बांगलादेशकडून खेळतो, पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. जेव्हा त्यांना फोन आले आणि माझ्याबद्दल माहिती देण्यात आली, तेव्हाच त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला', असं नयिमनं सांगितलं.

दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं चट्टोग्राम महानगर पोलिसांचे उप पोलीस आयुक्त अमीरुल इस्लाम यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलंय. तसेच नयिमला न्याय मिळेल, असे आश्वासनही दिलं. जे कुणी हे केलं आहे, त्याला शिक्षा होईल. पोलिसांचा प्रोटोकॉल आहे आणि त्यांना तो पाळावा लागतो, असं उप पोलीस आयुक्त म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेत प्रवेशासाठी नवी नियमावली लागू

Mumbai Local Megablock: रेल्वे प्रवाशांचे रविवारी होणार हाल; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे, जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra News Live Update : 'भेट म्हणजे पक्षप्रवेश नाही'; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर अंबादास दानवेंचे स्पष्टीकरण

राजघराण्यात रक्तरंजित थरार; भाजप आमदाराच्या सुनेवर गोळीबार, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT