RR VS SRH IPL 2023: रविवारी जयपूरच्या मैदानावर एक रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला घरच्याच मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात एक वेळ अशी देखील आली होती, जेव्हा असे वाटू लागले होते की राजस्थानचा संघ या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणार.
मात्र शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना अब्दुल समदने षटकार मारला आणि आपल्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
राजस्थान रॉयलसा संघाचा हा या हंगामातील सलग तिसरा पराभव आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या राजस्थान रॉयल्स संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाचा राजस्थान रॉयल्स संघाला जास्त फरक पडणार नाहीये. हा संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे.
मात्र त्यांचा नेट रन रेट कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर ८ गुणांसह सनरायझर्स हैदराबाद संघाने १० वे स्थान सोडून ९ व्या स्थानी उडी घेतली आहे. कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीचा संघ आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.
या संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी...
हार्दीक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने या हंगामात जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा संघ १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघ १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्स संघ ११ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. (Latest sports updates)
कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या तीनही संघांना जर प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवायचा असेल. तर त्यांना येणाऱ्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. हे तीनही संघ ८ गुणांसह तळाशी आहेत.
तर गुजरात टायटन्स संघ हा आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरू शकतो. तर चेन्नई, लखनऊ, राजस्थान, बंगळुरू, मुबंई आणि पंजाब या संघांना अजुनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
हैदराबादचा जोरदार विजय..
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने ६६ आणि यशस्वी जयस्वालने ३५ धावांचे योगदान दिले.
या खेळीच्या जोरावर हैदराबाद संघाने २ गडी बाद २१४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने सर्वाधिक ५५ तर, राहुल त्रिपाठीने ४७ धावांचे योगदान दिले.
शेवटी हॅरी ब्रुकने ताबडतोड फलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर अब्दुल समदने षटकार मारला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.