Narendra Modi on Vinesh Phogat :  Saam tv
Sports

Narendra Modi on Vinesh Phogat : 'तुम्ही चॅम्पियनचे चॅम्पियन आहात; विनेश फोगाट अपात्र झाल्यानंतर PM मोदी काय म्हणाले?

Narendra Modi x post on vinesh phogat : विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही चॅम्पियनचे चॅम्पियन आहात, असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवायचं विनेशचं स्वप्न भंग झालं आहे. या स्पर्धेत विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. भारताने या निर्णयाचा विरोध केला आहे. विनेशचं वजन ५० किलोपेक्षा जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित केले आहे. या निर्णयाचा सर्व भारतीयांना धक्का बसला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुम्ही चॅम्पियनचे चॅम्पियन आहोत. तुम्ही भारताचा अभिमान आहात. तुम्ही प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श आहात. फार दु:खद प्रकार आहे. मी शब्दांतून भावना व्यक्त करू शकलो असतो. मला विश्वास आहे की, तुम्ही मोठ्या दिमाखात पुन्हा पदार्पण कराल. आम्ही तुमच्यासोबत आहोत'.

29 वर्षीय विनेश फोगाटला ५० किलो वजनी गटात अपात्र घोषित करण्यात आलं आहे. विनेशचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याने विनेशला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे विनेशचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघाने दिली.

भारतीय ऑलिम्पिक संघाने म्हटलं की, 'भारतीय महिला कुस्तीपटू विनेश ५० किलो वजनीत गटात अपात्र झाली आहे. ही माहिती सांगताना दु:ख होत आहे. आज विनेशचं वजन ५० किलोपेक्षा अधिक भरलं. विनेशबाबत घेतलेल्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT