Pm Modi First Reaction on Asia Cup Final Match : भारताने आशिया चषकावर नवव्यांदा नाव कोरलं. तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, संजू सॅमसन यांच्या तुफान कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. भारताने पाच विकेट्सने विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. मोदींनी भारताच्या विजयानंतर एक्सवर पोस्ट केली. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत मोदींनी पुन्हा पाकिस्तानवर कुरघोडी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्सवरील पोस्टमुळे पाकिस्तानच संरक्षण मंत्र्याला चांगलीच मिर्ची लागली. ते म्हणाले की, अशी शांतता येणार नाही.
भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "खेळाच्या मैदानावरही ऑपेरशन सिंदूर सुरू आहे. याचा निकाल सारखाच आहे. भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. भारतीय खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन!" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पोस्ट पाकिस्तानच्या आसिफ ख्वाजा याला चांगलीच झोंबली. त्याने शांतता अशी येणार नसल्याचे वक्तव्य केलेय.
पीएम मोदींच्या पोस्टमुळे पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफ यांना मिर्ची चांगलीच झोंबली. मोदींच्या एक्स पोस्टला उत्तर देताना म्हणाले की, "क्रिकेटची संस्कृती आणि भावनेचा नाश करून, मोदी आपले राजकारण वाचवत आहेत. ते उपखंडातील शांती आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या शक्यतांना नष्ट करत आहेत. अशा प्रकारे शांती आणि सन्मान परत येत नाही. पाकिस्तान-भारत युद्धाचा स्कोअर 6/0 होता. आम्ही काही बोलत नाही. मोदींना भारत आणि जगात दोन्हीकडे अपमानित केले गेले आहे."
ख्वजा आसिफ यांच्या या पोस्टच्या आधी ७२ तास शरीफ यांनी केलेले एक वक्तव्यही व्हायरल होतेय. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शरीफ यांनी भारताचे ७ जेट्स पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर ७२ तासात आसिफ यांनी भारताचे सहा जेट्स पाडल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानकडून अनेकदा भारताच्या विमानांना पाडल्याचा खोटा दावा केला आहे. प्रत्येकवेळा पाकिस्तानच्या नेत्यांकडून वेगवेगळे आकडे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.