AUS VS SA Playing 11:आज आयसीसी महिला टी -२० विश्वचषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ आमने सामने येणार आहेत.
हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्यांदा स्पर्धेचे जेतेपद जिंकून इतिहास रचण्याची संधी असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ वर एका नजर टाकूया.(Latest Sports Updates)
ऑस्ट्रेलिया संघाने सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया संघाने सर्वोत्तम प्लेइंग ११ निवडण्यासाठी अनेक बदल केल्याचे पाहायला मिळाले होते. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ विनिंग कॉम्बिनेशनसह मैदानात उतरू शकतो.
अशी असू शकते ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११ :
एलिस हेली, बेथ मुनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एश्ले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा , जॉर्जिया वेअरहॅम , जेस जोनासेन, मेगन शूट आणि डार्सी ब्राऊन.
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिका संघाने बलाढ्य इंग्लंड संघाला पराभूत केले आहे. या संघातील खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मोलाचे योगदान दिले आहे.
त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघातही कुठलाही बदल न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशी असू शकते दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग ११ :
लॉरा वॉल्वोर्ट, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, सुने लुस (कर्णधार), क्लो ट्रायॉन, अनेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.