viral video twitter
क्रीडा

Viral Video: फुटबॉल खेळताना खेळाडूच्या अंगावर पडली वीज; एकाचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Lightning kills Footaballer: फुटबॉल खेळताना एका खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Lightning Strike In Live Football Match: दक्षिण अमेरिकेतील हुआनकायो या शहरात झालेल्या फुटबॉल सामन्यात धक्कादायक घटना घडली आहे. लाईव्हा सामन्यात वीज पडल्याने एका खेळाडूला आपला जीव गमवावा लागला आहे. यासह पाच खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना जुवेंतूद बेलाविस्टा आणि फेमिलिया यांच्यात झालेल्या लोकल सामन्यात घडली आहे. हा सामना सुरु असताना सामन्यातील २२ व्या मिनिटाला बेलाविस्टाचा संघ २-० ने आघाडीवर होता. त्यावेळी ढगांची गडगड सुरु झाली. त्यामुळे रेफ्रीने खेळाडूंना मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. नेमकी त्याचवेळी वीज पडली.

या घटनेत ३९ वर्षीय डिफेंडर जोस ह्युगोला आपले प्राण गमवावे लागले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वीज पडताच तो खेळाडू जमीनीवर कोसळतो.

त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यासह ४० वर्षीय गोलकिपर जुआन चौक्का देखील गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या घटनेत दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंचं वय १६,१९ आणि २४ असल्याचं म्हटलं जात आहे.

वीज पडून खेळाडूचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही FLO FC Bandung आणि FBI Subang यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान मैदानातच वीज पडल्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ही या वर्षातील दुसरी अशी घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : काँग्रेसचा गड अपक्ष भेदणार? एक्झिट पोलच्या अंदाज काय?

Sachin Shinde : भाजपला धक्का! सचिन शिंदे मशाल हाती घेणार | Marathi News

Maharashtra Exit Poll: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, चंद्रकांत पाटील संभाव्य आमदार? VIDEO

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली; अवघ्या १५० रन्समध्ये खुर्दा

Maharashtra Exit Poll : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT