Narendra Modi saam tv
Sports

'कोई नही है टक्कर में, क्यू पडेहो चक्कर में'; अविनाश साबळेसह माेदींच्या राष्ट्रकुलसाठी खेळाडूंना शुभेच्छा

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशातील अव्वल खेळाडूंशी साधला संवाद.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : कोणतेही दडपण न घेता सर्व शक्तीनिशी चांगलं खेळा (play). कोई नही है टक्कर में, क्यू पडेहो चक्कर में ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. त्यामुळे त्या वृत्तीने राष्ट्रकुल स्पर्धेत खेळा (common wealth games) असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) (PM Modi To India's CWG 2022 Squad) यांनी भारतातून (india) कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाणाऱ्या खेळाडूंना व्होकल टॉनिक देऊन प्रोत्साहन दिले.

पंतप्रधान नरेंद्र माेदींनी आज देशातील विविध खेळाडूंशी संवाद साधताना प्रथम महाराष्ट्रातील मैदानी खेळातील अव्वल खेळाडू अविनाश साबळे याच्याशी संवाद साधला. माेदी म्हणाले हिमालयात कर्तव्य बजावत आहात तुमचे काय अनुभव आहेत हे सांगू शकाल का. त्यावर अविनाश याने मी बीड जिल्ह्यातला असून सन 2012 मध्ये मी लष्करात भरती झालाे असे सांगितलं. ताे म्हणाला लष्करात भरती झाल्यानंतर माझ्या काैशल्यास आणखी वाव मिळाला.

अविनाश म्हणाला चार वर्षात मी कठाेर परिश्रम घेतले आहेत. ट्रेनिंगमुळे मला काेणत्या ही क्षेत्रात गेलाे तरी मी यशस्वी हाेईन असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला. सियाचीन आणि स्टीपलचेस यामध्ये काही साधर्म्य आहे का असे माेदींनी त्यास विचारले. त्यावर ताे म्हणाले हाे. सियाचीन येथे सर्व अडथळेच आहे. ते अडथळे मी दूर करीत असल्याने मैदानात देखील मला अडचण जाणवत नाही.

हाेय आपण म्हणत आहात ते खरं आहे. ट्रेनिंगमध्ये मी माझे वजन कमी केले आहे. त्यावेळी माझं वजन 74 किलाे हाेते आणि आत्ता 53 किलाे आहे. दरम्यान पंतप्रधान माेदींनी अविनाश साबळे यास स्पर्धेस शुभेच्छा देत अन्य खेळाडूंशी संवाद सुरु ठेवला.

Edited By : Siddhath Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT