rahul chaudhari twitter
Sports

PKL Auctions 2024: युवा खेळाडू मालामाल, अनुभवी राहुल चौधरीला नाही मिळाला खरेदीदार

Rahul Chaudhari Unsold PKL Auction: भारताचा स्टार चढाईपटू राहुल चौधरी प्रो कबड्डी २०२४ स्पर्धेच्या लिलावात अन्सोल्ड राहिला आहे.

Ankush Dhavre

प्रो कबड्डी 2024 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावाच्या पहिल्या दिवशी खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. तर दुसऱ्या दिवशी अनेक स्टार खेळाडू अन्सोल्ड राहिले. ज्यात राहुल चौधरी सारख्या खेळाडूंचाही समावेश आहे.

एकेकाळी प्रो कबड्डी गाजवणाऱ्या राहुल चौधरीचा या हंगामासाठी सी कॅटेगरीत समावेश करण्यात आला होता. त्याची बेस प्राईज १३ लाख रुपये होती. मात्र ज्यावेळी त्याचं नाव पुकारलं गेलं. त्यावेळी कोणीच बोली लावली नाही.

राहुल चौधरीसारखा अनुभवी खेळाडू अन्सोल्ड होणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे. कारण त्याला बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. असा खेळाडू संघात असल्याने संघातील युवा खेळाडूंनाही फायदा होत असतो.

राहुल चौधरीची कारकीर्द

राहुल चौधरी हा प्रो कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून खेळतोय. गेली २ वर्ष तो जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळतोय. स्पर्धेतील नवव्या हंगामात जयपुर पिंक पँथर्स संघाने जेतेपदाचा मान मिळवला होता. त्यानंतर दहाव्या हंगामात त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. बरेच दिवस त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं.

अजूनही आहे संधी

लिलावातील पहिल्या फेरीत तो अन्सोल्ड झाला असला तरीदेखील त्याच्याकडे आणखी एक संधी असणार आहे. कारण अन्सोल्ड झालेल्या खेळाडूंना आणखी एक संधी मिळते. या खेळाडूंवर पुन्हा एकदा बोली लावली जाते. त्यामुळे राहुल चौधरीवर पुन्हा एकदा बोली लावली जाऊ शकते. यासह इतर खेळाडूंनाही आणखी एक संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT