Pakistan Cricket Team news Saam tv
Sports

Pakistan Cricket Team : आशिया कपमध्ये पराभूत झाल्यानंतर पीसीबीचा महत्वाचा निर्णय; पाकिस्तानी खेळाडूवर मोठी कारवाई

Pakistan Cricket Team news : आशिया कपमध्ये पराभूत झाल्यानंतर पीसीबीचा महत्वाचा निर्णय घेतलाय. पीसीबीने पाकिस्तानी खेळाडूवर मोठी कारवाई करण्यात आलीये.

Vishal Gangurde

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताकडून पराभवामुळे पीसीबी नाराज

सर्व पाकिस्तानी खेळाडूंच्या परदेशी लीगसाठी एनओसी रद्द

बाबर आझम, रिझवान, शाहीनसह या प्रमुख खेळाडूंना फटका

पाकिस्तान क्रिकेट संघात मोठ्या बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे

Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतलाय. बोर्डाने सर्व खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी दिल्या जाणाऱ्या एनओसी रद्द करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी टीममधील खेळाडूंचं जगभरात होणाऱ्या लीगमध्ये खेळूनही टी२० फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी कमी केली नाही. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानी संघ टीम इंडियाकडून तीन वेळा पराभूत झाला.

पाकिस्तानी वृत्त संस्थेच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सैयद समीर अहमद यांनी सर्व अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पाकिस्तानी खेळाडूंना परदेशात टी२० लीग खेळण्यास परवानगी नसेल. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना देशातील टी२० लीग खेळावे लागतील.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचा फटका सर्व खेळाडूंना बसेल. यात बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह अफरिदी, हारिस रउफ, शादाब खान आणि फहीम अशरफ यांच्या नावाचा समावेश आहे.

आयसीसी आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानची टीमने भारताला सोडून इतर सर्व संघाला पराभूत केलं. मात्र, टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभवाला सामोरे जावं लागलं. आशिया कपमधील अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघाने टीम इंडियाला कडवी झुंज दिली. मात्र, तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीने टीम इंडिया ५ विकेटने जिंकली. आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे पीसीबी नाराज आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाविरोधात कठोर निर्णय घेतला आहे.

संघात फेरबदल?

पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड लवकरच खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर इतर तरुण खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. संघाच्या कोचमध्येही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

Maharashtra Live News Update: सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा १ कोटी रुपयांचा निधी

SCROLL FOR NEXT