PBKS vs SRH Match Updates
PBKS vs SRH Match Updates Saam TV
क्रीडा | IPL

PBKS vs SRH Match : शिखर धवनची झुंजार खेळी! अवघ्या एका धावाने हुकलं शतक; हैदराबादसमोर १४४ धावांचं लक्ष्य

Satish Daud-Patil

PBKS vs SRH Match Live updates : कर्णधार शिखर धवनच्या ६६ चेंडूत नाबाद ९९ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने सनराईज हैदराबादसमोर विजयासाठी धावांचे १४४ आव्हान ठेवलं आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. (Latest sports updates)

फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरूवात अतिशय निराशाजनक झाली. मागच्या सामन्यात (IPL 2023) विस्फोटक खेळी करणाऱ्या प्रभसिमरनला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यापाठोपाठ मार्को यान्सनने मॅट शॉर्ट आणि जितेश शर्माला झटपट माघारी पाठवलं.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सॅम करनने शिखर धवनला साथ देत पंजाबचा डाव पुढे नेला. सॅम करन मयांक मार्कंडेच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर एकापाठोपाठ पंजाबचे गडी बाद होत गेले. एकवेळी पंजाबची अवस्था ९ बाद ८८ झाली होती.

मात्र, शिखर धवनने तळातील फलंदाजाला हाताशी धरत पंजाबचा डाव पुढे नेला. शिखर धवनने ६६ चेंडूत नाबाद ९९ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे पंजाबला सन्माजनक धावसंख्या उभारता आली.

पंजाबकडून सॅम करन आणि शिखर धवन वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी दावसंख्या गाठता आली नाही. हैदराबादकडून मयांक मार्कंडेने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

Samruddhi Kelkar: तुझ ते लाजण अन् लाजून नाजूक हसणं...

Narendra Modi: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही; पंतप्रधान मोदी कडाडले

SCROLL FOR NEXT