Punjab Kings Saam Tv
Sports

PBKS VS RCB IPL 2023: RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का! एक हाती सामना फिरवणारा फलंदाज होऊ शकतो बाहेर

Shikhar Dhawan: हा सामना सुरू होण्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

PBKS VS RCB Match Preview: आज आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर गेल्या सामन्यात विजय मिळवलेला पंजाब किंग्ज संघ हा सामना जिंकून आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

शिखर धवन खेळणार का?

पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन हा या हंगामात जोरदार फॉर्ममध्ये आहे. मात्र ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेल्या Shikhar Dhawan ला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जोरदार फॉर्ममध्ये असूनही दुखापतीमुळे त्याला Lucknow Super giants संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून बाहेर राहावे लागले होते. अजूनही त्याच्या फिटनेसबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे आजही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पंजाबच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी..

शिखर धवन नंतर सिकंदर रझाने Punjab Kings संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर मॅथ्यु शॉर्ट, हरप्रीत सिंग आणि एम शाहरूखने देखील पंजाबच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.

मात्र Royal challengers Bangalore सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करायचं असेल, तर पंजाब किंग्ज संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जर शिखर धवन या सामन्यासाठी फिट असेल तर नक्कीच पंजाबचं पारडं या सामन्यात जड असणार आहे. (Latest sports updates)

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग 11:

पंजाब किंग्ज प्लेइंग 11(Punjab Kings Playing 11):

शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग, सिकंदर रझा, सॅम कुरान, जितेश शर्मा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग 11 (Royal Challengers Bangalore Playing 11):

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विशक विजयकुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : तुझाही संतोष देशमुख करू; हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या डॉक्टरच्या भावावर प्राणघातक हल्ला

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा वाद उफाळला, शरद पवार गटानं चिमटा काढला| VIDEO

Maharashtra Live News Update: शरणू हांडे अपहरण प्रकारणतील सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी

Maharashtra Tourism: माथेरान, महाबळेश्वर विसराल; भंडारा जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Dadar Kabutarkhana: कबुतरांना खायला देणं अंगाशी आलं; १.३२ लाखांचा दंड वसूल | VIDEO

SCROLL FOR NEXT