Royal Challengers vs Punjab Kings Head-to-Head Record and Pitch Report in Marathi twitter
Sports

PBKS vs RCB Pitch Report: पंजाब की बंगळुरु? कोण पडणार स्पर्धेतून बाहेर? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड अन् पिच रिपोर्ट

IPL 2024: PBKS vs RCB Head To Head Record | आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५८ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५८ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामना धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात पराभूत होणारा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. सध्या गुणतालिकेत आरसीबीचा संघ सातव्या स्थानी आहे. तर पंजाबचा संघ आठव्या स्थानी आहे.

कशी असेल खेळपट्टी?

आयपीएल २०२४ स्पर्धेत पंजाबचा संघ दुसऱ्यांदा या मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना स्लो खेळपट्टीवर खेळवला गेला होता. या खेळपट्टीवर चेन्नईला अवघ्या १६७ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ विजयापासून २८ धावा दुर राहिला होता. मात्र आज होणाऱ्या सामन्यात हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड...

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला,तर दोन्ही संघ ३२ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान पंजाबने १७ सामने पंजाबने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने १५ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर गेल्या ५ सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर ३ सामन्यांमध्ये पंजाबने बाजी मारली आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

अशी असू शकते पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग ११ (Punjab Kings Playing 11 Prediction):

जॉनी बेयरस्टो, रिले रुसो, शशांक सिंग, सॅम करेन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंगम

इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player PBKS): प्रभसिमरन सिंग.

अशी असू शकते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची प्लेइंग ११ (RCB Playing 11 Prediction)

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, कॅमरन ग्रीन, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, स्वप्निल सिंग, यश दयाल, विजयकुमार वैसाख, मोहम्मद सिराज.

इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player RCB): रजत पाटीदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT