PBKS vs GT head to head record news punjab kings vs Gujarat Titans news in marathi amd2000 twitter
Sports

PBKS vs GT,IPL 2024: पराभवाची परतफेड करण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात! पंजाबविरुद्ध असा राहिलाय हेड टू हेड रेकॉर्ड

PBKS vs GT, Head To Head Record: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज (२१ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात गुजरातचा संघ पंजाब किंग्ज संघाला आपल्या होम ग्राऊंडवर आव्हान देताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज (२१ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात गुजरातचा संघ पंजाब किंग्ज संघाला आपल्या होम ग्राऊंडवर आव्हान देताना दिसून येणार आहे. हा सामना महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७: ३० वाजता सुरू होईल. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

गुजरात टायटन्स संघाने २०२२ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या आहेत. गेल्या सामन्यात हे दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने आले होते. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला होता.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे. गुजरातने २ तर पंजाबने देखील २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना आघाडी घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स रेकॉर्ड ( मोहालीत)

सामना -१

गुजरात टायटन्स -१

पंजाब किंग्ज- ०

पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स रेकॉर्ड ( नरेंद्र मोदी स्टेडियम)

सामना -१

गुजरात टायटन्स -०

पंजाब किंग्ज- १

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग/अथर्व तायडे, राइली रूसो, सॅम करन (कर्णधार), लियाम लिविंगस्टन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगीसो रबाडा, अर्शदीप सिंग

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद/अज़मतुल्लाह उमरजई, स्पेंसर जॉनसन, संदीप वारियर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump tariff policy : रशियाच्या रागानं ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्ब फुटला, जागतिक दबावापुढे टाटा बायबाय?

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

Success Story: २० वेळा फेल, एकदा नव्हे तर दोनदा UPSC पास; विवेक यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Coffee Pudding Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी कॉफी पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

SCROLL FOR NEXT