Paul Collingwood  x
Sports

महिलांशी अश्लील संभाषण करतानाचा ऑडिओ लीक, World Cup जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला संघातून हाकललं

Paul Collingwood : इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडवर कारवाई करण्यात आली आहे. महिलांशी अश्लील भाषेत संभाषण करतानाची त्याची ऑडिओ क्लिक लीक झाली होती.

Yash Shirke

  • इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जोरदार धक्का

  • अ‍ॅशेस मालिकेपूर्वी संघातून बाहेर काढलं

  • वादग्रस्त वक्तव्य आणि कर-थकबाकीचे आरोप

ECB म्हणजेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषक विजेत्या कर्णधारावर कारवाई केली आहे. अ‍ॅशेस मालिकेपूर्वी बोर्डाने कर्णधाराला संघातून बाहेर काढले आहे. या कर्णधाराचे काही ऑडिओ लीक झाले होते. ऑडिओमध्ये तो महिलांशी अश्लील आणि आक्षेपार्ह पद्धतीने बोलत होता. ऑडिओ लीकमुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त कोट्यावधी रूपयांच्या कर थकबाकीचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. या कर्णधाराचे नाव पॉल कॉलिंगवूड असे आहे.

एकेकाळी इंग्लंड क्रिकेटमधील खास असलेला पॉल कॉलिंगवूड हा इंग्लंडच्या संघाच्या प्रशिक्षकांपैकी एक आहे. पण मागील काही महिन्यांपासून तो प्रशिक्षण शिबिरात किंवा संघातसोबत दिसला नाहीये. वैयक्तिक कारणांमुळे त्याने नॉटिंगहॅममध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी अ‍ॅशेस मालिकेसाठी त्याला प्रशिक्षकांच्या संघात समाविष्ट केले जाणार नसल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे.

माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानने एका पॉडकास्टमध्ये क्रिकेटपटूंमध्ये फिरणाऱ्या अश्लील ऑडिओ रेकॉर्डिंगचा उल्लेख केला होता. त्यानंतर पॉल कॉलिंगवूड या प्रकरणात अडकले गेले. लीक झालेल्या ऑडिओमध्ये पॉल कॉलिंगवूड महिलांशी अश्लील, आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचा ऐकायला मिळते. या प्रकरणामुळे कॉलिंगवूड यांच्या अडचणी वाढल्या. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे.

२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील टी२० विश्वचषकादरम्यान कॉलिंगवुड केपटाऊनमधील मॅव्हेरिक्स या स्ट्रिप क्लबमध्ये दिसला. व्लब ताबडतोब सोडल्याचा दावा करूनही क्रिकेट बोर्डाने त्याला १,००० पौंड दंड ठोठावला होता. २०२२ मध्ये अ‍ॅशेस पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर काही दिवसांतच, बार्बाडोसमध्ये एका महिलेला चुंबन घेतानाचे त्यांचे फोटो समोर आले. ही घटना इंग्लंडच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : हृदयद्रावक! वडिलांची नजर चुकवून ४ वर्षाचा शिवराज ट्रॅक्टरवर चढला, अचानक गिअर पडला अन् थेट...

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Poet Death: महाराष्ट्राचा तेजस्वी तारा निखळला! सुप्रसिद्ध कवी यांचे निधन, मराठी साहित्यविश्वात शोककळा

नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

Bads of Bollywood: समीर वानखेडे यांच्या याचिकेला नेटफ्लिक्सचा विरोध; 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' विरोधात केला होता उच्च न्यायालयात अर्ज

SCROLL FOR NEXT