World Cup 2023 Saam tv
Sports

World Cup 2023:पॅट कमिन्सने शब्द खरा केला, विश्वचषक जिंकून १.३ लाख लोकांना गप्प केलं

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकून पॅट कमिन्सने शब्द खरा केला आहे.

Vishal Gangurde

World Cup 2023:

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅटने स्टेडियममधील १.३ लाख प्रेक्षकांना गप्प करणार असल्याचा दावा केला होता. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकून पॅट कमिन्सने शब्द खरा केला आहे. (Latest Marathi News)

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी म्हणजे शनिवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देताना विश्वचषक जिंकण्याचा दावा केला होता. कमिन्स म्हटला होता की, 'विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये १.३ लाख क्रिकेट चाहते भारताला पाठिंबा देताना उपस्थित असतील. या सर्वांना शांत गप्प करणं एक समाधानकारण अनुभव राहील'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामन्यादरम्यान, रोहित, गिल आणि अय्यर बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं होतं. मात्र,२८ व्या षटकात पॅटने विराटला क्लीन बोल्ड केले. त्यावेळी संपूर्ण स्टेडियम शांत झाल्याचं पाहायला मिळाला. विराट बाद होताच स्टेडियम एकच शांतता पसरली होती. विराट कोहली ५४ धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता

टीम इंडियाचा तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून टीम इंडियाने दिलेले आव्हान पूर्ण केल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon Blast Verdict: दहशतवाद आणि जिहादचा रंग हिरवाच; मालेगाव खटल्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया|VIDEO

Kiara Advani : बारीक मुलींनी कॉपी करा कियारा अडवाणीच्या या फॅशन टिप्स तुम्हीही दिसाल ग्लॅमरस

YouTube Ban: 'या' देशात १६ वर्षांखालील मुलांवर यूट्यूब बंदी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: - प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार

Ind vs Eng 5th Test : बुमराह, पंत आणि शार्दुल बाहेर; पाचव्या कसोटीत कुणाला मिळाली संधी, अशी आहे भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT