Injury Forces Pat Cummins to Return to Australia, SRH Captaincy Concern Grows/Social media saam tv
Sports

IPL अर्ध्यावर सोडून कर्णधार अचानक मायदेशी परतला, सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

srh captain pat cummins returns australia injury concern update : सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला आहे. आता तो पुन्हा कधी संघात रुजू होणार, याबाबत काहीच अपडेट मिळालेली नाही.

Nandkumar Joshi

भारतात येऊनही दोन सामन्यांत बाहेर बसलेला सनरायझर्स हैदराबाद संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्याच्या आयपीएल कमबॅकसाठी चाहत्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुखापतीमुळं आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांत तो खेळू शकला नव्हता. आता अचानक तो मायदेशी परतला आहे.

आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधी पॅट कमिन्स भारतात आला होता. पण दुखापतीमुळे तो सुरुवातीचे दोन सामने खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व इशान किशननं केलं होतं. एका रिपोर्टनुसार, कमिन्स अचानक मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलियाला परतला आहे. आता तो एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात येऊन आयपीएल स्पर्धा खेळू शकतो. त्यामुळे आगामी काही सामन्यांत हैदराबाद संघाचं कर्णधारपद इशान किशानकडे असेल.

इएसपीएन-क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यावर उपचार आणि तपासणीसाठी तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी संघाशी जोडला गेला होता. मात्र, दुखापतीमुळे तो सुरुवातीचे दोन सामने खेळू शकला नव्हता. आता ऑस्ट्रेलियात परतल्यामुळं तो पुढील काही सामने देखील खेळू शकणार नाही. रिपोर्टनुसार, कमिन्स ऑस्ट्रेलियात एक अंतिम स्कॅन करणार आहे. रिपोर्ट चांगला आला तर तो १७ एप्रिलपर्यंत भारतात येऊन हैदराबाद संघाच्या चमूत दाखल होईल.

वर्षभरापासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त

पॅट कमिन्स गेल्या वर्षभरापासून पाठिच्या दुखण्याचे त्रस्त आहे. त्यामुळे जुलै २०२५ नंतर फक्त एक सामना तो खेळला आहे. अॅशेस मालिकेत फक्त एका कसोटी सामन्यात तो खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर आहे. टी २० वर्ल्डकपमध्येही तो खेळला नव्हता.

हैदराबाद संघात कधी परतणार?

सध्याच्या परिस्थितीत पॅट कमिन्स किमान आणखी चार सामन्यांना मुकणार आहे. रिपोर्टनुसार, २१ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणाऱ्या सामन्यात तो कमबॅक करू शकतो. सनरायझर्स संघाची गोलंदाजी सध्या तरी कमकुवत असल्याचे दिसते. मागील सामन्यात हैदराबाद संघानं कोलकाता नाइट रायडर्स संघाला मात दिली होती. पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसारख्या धाकड संघासमोर हैदराबादचा संघ डळमळीत झालेला दिसला. अशात राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जसारख्या इतर संघांसोबतच्या सामन्यांतही हैदराबादला अडचणींना सामोरे जावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

Gold Earrings Designs: डेली वेअरसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

HIV Symptoms: 'सतत ताप, वजन कमी होणे...'; पुरुषांमध्ये एड्सची सुरुवातीची 7 भयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

७१ लाख महिलांचा लाभ रद्द; लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT