Paris Olympics 2024 सोशल मीडिया
क्रीडा

Paris Olympics 2024 : अमन सेहरावतची पदकाकडे वाटचाल, अल्बानियाच्या पैलवानाला केलं चीतपट

Paris Olympics 2024 : भारतीय पैलवान अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व सामन्यात शानदार प्रदर्शन करत विजय मिळवलाय.

Namdeo Kumbhar

Paris Olympics 2024 : भारतीय पैलवान अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात शानदार प्रदर्शन करत उपांत्य फेरीत धडक मारली. आज उपांत्य (semi-final) सामना खेळणार आहे.

अमन सेहरावत (Wrestler Aman Sehrawat) याने अल्बानियाच्या पैलवानाला 12-0 ने पराभव करत उपांत्य फेरीत (semi-final) प्रवेश केलाय. अमन सेहरावत एकतर्फी विजय मिळवत पदकाच्या दिशेने वाटचाल केली. अमन सहरावत आज रात्री ९.३० वाजता उपांत्य सामना खेळणार आहे. त्याने उपांत्य सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे एक पदक निश्चित होणार आहे. जर फायनलमध्येही त्याने बाजी मारली तर भारताचे गोल्ड निश्चित मानले जातेय.

अमन सहरावतचे शानदार करियर

अमन सेहरावत याने आतापर्यंत शानदार कामगीरी केली. त्याची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. 21 वर्षीय अमनने यापूर्वीही अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. गेल्या वर्षी त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वर्षी त्याने झाग्रेबमध्येही सुवर्णपदकावर नाव कोरले होते. बुडापेस्टमध्ये त्याने रौप्यपदक जिंकले. 2022 मध्ये अमनने 61 किलो गटात रौप्य पदकही जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन 57 किलो गटात खेळत आहे.

अमन सहरावतचा प्रवास -

अमन सेहरावत याने कुस्तीमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. पण ऑलिम्पिकपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. लहान वयातच तो पोरका झाला होता, आई-बाबांचं निधन झालं होतं. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही त्याने हार मानली नाही. तो उभा राहिलाय. पैशाची चणचणही होती, पण त्यानं मात केली. दिल्ली छत्रसाल स्टेडियममध्ये अमन सहरावत याने कुस्तीचे धडे घेतले. प्रवीण दहिया याने त्याला कुस्तीचे डाव शिकवले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT