Vinesh Phogat Saam Tv
क्रीडा

Vinesh Phogat: शेवटची आशाही मावळली! विनेश फोगाटला पदक मिळणार नाही, CAS ने फेटाळली याचिका

Paris Olympics 2024: विनेश फोगाटची पदक मिळवण्याची शेवटची आशाही मावळली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेशने रौप्य पदक बहाल करण्याबाबत इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) याचिका दाखल केली होती.

Satish Kengar

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची पदक मिळवण्याची शेवटची आशाही मावळली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेशने रौप्य पदक बहाल करण्याबाबत इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) याचिका दाखल केली होती. ज्यावर आता निर्णय आहे. सीएएसने विनेशची याचिका अपील फेटाळले आहे. यासह तिचं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगलं आहे.

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक सामन्याआधी निर्धारित वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने अपात्र घोषित करण्यात आलं होतं. या निर्णयानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला होता. तर विनेशचीही निराशा झाली होती.

विनेश फोगाटने तिला रौप्य पदक मिळावं म्हणून कोर्ट इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टकडे (CAS) याचिका केली होती. ज्यावर सीएएसने आता निर्णय जाहीर केला आहे आणि त्यांनी विनेश फोगाटची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच तिला रौप्य पदक देण्यासही नकार दिला आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत महिलांच्या 50 किलो गटात विनेश फोगाटने पहिल्या फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत-1 युई सुसाकीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. यानंतर विनेशने आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही सहज जिंकला आणि संध्याकाळी उपांत्य फेरीत क्युबाच्या गुझमन लोपेझचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

यानंतर यासह तिचे पदकही निश्चित झाले. तिला सुवर्ण किंवा रौप्य पदक विनेशला मिळेल, असं वाटत होतं. त्यानंतर 7 ऑगस्टला फायनल होणार होती. मात्र नियमानुसार फायनलपूर्वी सकाळी पुन्हा वजन मोजावे लागले. येथेच विनेशचे वजन निर्धारित 50 किलो वजनापेक्षा 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर UWW च्या नियमानुसार तिला अपात्र घोषित करून अंतिम फेरीतून बाहेर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT