Paris Olympics Opening Ceremony Live Saam Digital
Sports

Paris Olympics Opening Ceremony Live : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'छा गया इंडिया': नेशन ऑफ परेड्समध्ये पीव्ही सिंधू, शरथ कमल यांनी केलं भारताचं नेतृत्व

Paris Olympics Opening Ceremony : पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्याला सुरुवात झाली असून सीन नदीच्या पात्रात बोटींमधून परेड सुरू आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरथ कमल यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं.

Sandeep Gawade

पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्याला सुरुवात झाली असून सीन नदीच्या पात्रात बोटींमधून परेड सुरू आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल भारतीय संघाचे ध्वजवाहक आहेत. त्यांनी नेशन ऑफ परेड्समध्ये भारताचं नेत़ृत्व केलं. भारतीय पथकात ऑलिम्पिकमध्ये सहभागी सर्व खेळाडू सहभागी झाले होते.

ऑलिम्पिक सोहळ्याच्या परेडमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भारतीय संघाची संचलनावेळी ओळख करून देण्यात आली. यावेळी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरथ कमल भारताचे ध्वजधारक होते. संचलनावेळी भारतीय खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला.12 वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी भारताने 78 खेळाडू आणि प्रशिक्षक पॅरिस ऑलिम्पिकसाठी पाठवले आहेत.

आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताचं कोणी कोणी केलं नेतृत्व

१९२० - पुर्मा बॅनर्जी

१९३२ - लाल शाह बोखारी

१९३६ - मेजर ध्यानचंद

१९४८ - तालिमेरान एओ

१९५२ - बलबीर सिंग सीनियर

१९५६ - बलबीर सिंग सीनियर

१९६४ - गुरबचन सिंग रंधावा

१९७२ - डी.एन. डिव्हाईन जोन्स

१९८४ - जफर इक्बाल

१९८८ - करतार सिंग

१९९२ - शायनी अब्राहम

१९९६ - प्रगट सिंग

२००० - लिएंडर पेस

२००४ - अंजू बॉबी जॉर्ज

२००८ - राज्यवर्धन सिंह राठोड

२०१२ - सुशील कुमार

२०१६ - अभिनव बिंद्रा

२०२० - मेरी कॉम, मनप्रीत सिंग

२०२४ - शरथ कमल, पीव्ही सिंधू

पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात पाऊसाचंही आगमन झालं. परंतु समारंभाचा उत्साह कायम राहिला. उद्घाटन सोहळ्यात पॅरिसमधील प्रसिद्ध असलेले सर्व घटकांची झलक दाखवण्यात आली. प्रेमाचे शहर, लाइट्सचे शहर, मोनालिसा, पार्कौर, कॅबरे, लुव्रे म्युझियम आणि नॉट्रे डेम कॅथेड्रल यासारख्या शहरातील प्रतिष्ठित ठिकाणांची झलक हजारो जाहत्यांना पाहता आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT