aman sehrawat twitter
Sports

Paris Olympics 2024: अमन सेहरावतचा सेमीफायनलमध्ये अवघ्या २ मिनिटात पराभव; ब्राँझ जिंकण्याची संधी

HIGUCHI Rei vs Aman Sehrawat, Wrestling Semi Final: भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताला पाचवं पदक निश्चित करण्याची संधी होती. ५७ किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात अमन सेहरावत (Aman Sehrawat) आणि जपानचा हिगुची रेई हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय पैलवान अमनला अवघ्या २ मिनिटात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अमनला हा सामना जिंकून आपलं एक पदक निश्चित करण्याची संधी होती. मात्र या सामन्यात त्याला १२-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुवर्ण आणि रौप्यपदकाची संधी हुकली असली तरीदेखील त्याला कांस्यपदक पटकावण्याची संधी असणार आहे. त्याचा कांस्यपदकासाठीचा सामना उद्या रात्री १० वाजता होणार आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर हिगुची रेई आणि अमन यांच्यात एकतर्फी लढत पाहायला मिळाली. हिगुची रेईने सामना सुरु होताच अमनवर आक्रमण केलं. त्यानंतर अमनवर दबाव वाढला. त्याला काहीही करुन पॉईंट स्कोअर करायचे होते. मात्र हिगुची रेईने त्याला संधीच दिली नाही. त्याने १०-० ने आघाडी घेताच अवघ्या २ मिनिटात रेफ्रीने हिगुची रेईला विजयी घोषित केलं

भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने शानदार पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत शानदार खेळ केला. त्याने उप उपांत्य फेरीतील सामन्यात अल्बानियाच्या पैलवानाला आस्मान दाखवलं. या सामन्यात त्याने १२-० ने बाजी मारली. यासह उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला होता.

अशी राहिलीये कारकिर्द

अमन सेहरावतने आतापर्यंत शानदार खेळ करुन दाखवला आहे. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने झाग्रेबमध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं. याआधी झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्येही त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तो ५७ किलो ग्रॅम वजनी गटात खेळण्यासाठी उतरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT