lakshya sen : लक्ष्य सेनच्या ऑलिंपिकमधील वाटचालीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.  ANI
क्रीडा

Lakshya Sen Paris Olympics : लक्ष्य सेनला ऑलिंपिकमध्ये जोरदार झटका, पहिला सामना जिंकला, पण एका नियमानं आणलं अडचणीत!

Nandkumar Joshi

पॅरिस ऑलिंपिकमध्ये पहिला सामना जिंकून दमदार सुरुवात करणाऱ्या आणि कोट्यवधी भारतीयांच्या आशा-अपेक्षा उंचावणारा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन यालाच काहीही चूक नसताना मोठा फटका बसला आहे. केवळ एका नियमामुळं पहिला सामना जिंकूनही न जिंकल्यासारखं झालं आहे. पुरुष एकेरी गट एलमधील पहिल्या सामन्यात केविन कॉर्डनला त्यानं नमवलं. पण दुखापतीमुळं तो ऑलिंपिकमधून बाहेर पडला आहे. त्यामुळं नियमानुसार लक्ष्य सेनचा हा विजय अमान्य करण्यात आला आहे.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकरनं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. त्यामुळं भारतीय चमूची दमदार सुरुवात झाली आहे. दुसरीकडे बॅडमिंटनमध्ये जबरदस्त सुरुवात करून देत लक्ष्य सेननं इतर बॅडमिंटनपटूंचं मनोधैर्य उंचावलं होतं. पण त्यालाच ऑलिंपिकच्या नियमाचा मोठा फटका बसला आहे. लक्ष्य सेननं मिळवलेला पहिला विजय हा अमान्य करण्यात आला आहे.

नियमाचा फटका

लक्ष्य सेननं पहिला सामना जिंकला, पण तो जिंकून न जिंकल्यासारखाच आहे. कारण तो नियमानुसार अमान्य करण्यात आला आहे. त्याने मिळवलेला विजय हा रेकॉर्ड बुकमधून हटवण्यात आला आहे. त्यामुळं लक्ष्य सेनसाठी पॅरिस ऑलिंपिकच्या पुढच्या वाटचालीत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

ज्याला पराभूत केलं, तोच ऑलिंपिकमधून बाहेर

लक्ष्य सेनचा पहिला विजय अमान्य करण्यात आला आहे. कारण ज्या खेळाडूला एल गटातील पहिल्या फेरीत त्यानं पराभूत केलं होतं, तो केविन कॉर्डन आता ऑलिंपिकमधून बाहेर झाला आहे. त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळं त्यानं ऑलिंपिकमधून माघार घेतली आहे. आता लक्ष्य सेनला आपल्या गटातील उर्वरित खेळाडूंसोबत एक सामना अधिकचा खेळावा लागणार आहे.

लक्ष्य सेनसमोरचं आव्हान

एल गटात लक्ष्य सेनला आता इंडोनेशियाचा जोनाथन क्रिस्टी आणि बेल्जियमच्या जुलियन कारागी याच्याशी सामना करावा लागणार आहे. त्यातल्या कारागीविरुद्धचा रेकॉर्ड २-० आहे. पण जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रिस्टीविरुद्धची लढत लक्ष्यसाठी महत्वाची असणार आहे. बॅडमिंटन कोर्टवर लक्ष्य आणि क्रिस्टी यांच्यात आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. त्यात केवळ एकदाच लक्ष्यला जिंकता आलंय. तर चार सामन्यांत क्रिस्टीनं लक्ष्यला पराभूत केलं आहे.

केविन कॉर्डनने ऑलिंपिकमधून माघार घेतल्याने एल गटातील संपूर्ण वेळापत्रकच बदललं आहे. लक्ष्य सेनला तीन सामने खेळावे लागणार आहेत. तर क्रिस्टी आणि जुलियनला प्रत्येकी २-२ सामनेच खेळावे लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT