lakshya sen twitter
Sports

Lakshya Sen, Paris Olympics 2024: आता एकच लक्ष्य! Lakshya Sen ने ऑलिम्पिक सेमीफायनलमध्ये प्रवेश करत रचला इतिहास

Paris Olympics 2024, Lakshya Sen vs Chou Tien chen Match Result: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये लक्ष्य सेनने शानदार विजय मिळवत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. पहिल्याच सामना जिंकल्यानंतर विरोधी खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे त्याचा हा सामना गृहीत धरला गेला नव्हता.

मात्र पुढील सर्व सामन्यांमध्ये त्याने शानदार कामगिरी केली. प्री क्वार्टरफानलमध्ये त्याने आपलाच सहकारी प्रणॉयचा पराभव करत क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान क्वार्टरफायनलमध्ये त्याने चायनीच ताइपैच्या चौ टिएन-चेनचा पराभव केला आहे. यासह तो बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये जाणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.

शुक्रवारी लक्ष्य सेनने इतिहास रचला आहे. मात्र गुरुवारचा दिवस हा भारतीय बॅडमिंटन प्रेमींसाठी निराशानजनक होता. ऑलिम्पिक पदकासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पीव्ही सिंधूचा धक्कादायक पराभव झाला, त्यानंतर चिराग शेट्टी आणि साईराज रँकिरेड्डी या जोडीचाही पराभव झाला. हा पराभव भारतीय फॅन्ससाठी निराशाजनक होता. मात्र लक्ष्य सेनची सेमिफायनलमध्ये एन्ट्री ही बातमी कोट्यावधी भारतीयांना दिलासा देणारी आहे.

चायनीज ताईपैच्या चोयू टिएन चेनने आणि भारताच्या लक्ष्य सेन यांच्याच अटीतटीची लढत पार पडली. पहिल्या गेममध्ये चोयू टिएन चेनने १२-९ अशी आघाडी घेतली होती. मात्र लक्ष्यने कमबॅक करत ही आघाडी १४-१५ ने कमी केली. दोघेही बचावात आणि आक्रमणात कुठेच कमी पडत नव्हते. पॉईंट त्यालाच मिळत होता, जो चूक करत होता. पहिला गेम १८-१८ ने बरोबरीत आला होता. मात्र पहिल्या गेममध्ये चोयू टिएन चेनने बाजी मारत २१-१९ ने हा गेम आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. २-० ने आघाडी घेतलेल्या लक्ष्यला चोयू टिएन चेनने ४-४ च्या बरोबरीत आणलं. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये बराच वेळ रॅली सुरु राहिली. शेवटी लक्ष्यने १८-१३ ने मजबूत आघाडी घेतली. या गेममध्ये सेनने त्याला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. हा गेम लक्ष्य सेनने जिंकला.

दोघांनी १-१ गेम जिंकल्यानंतर सामना तिसऱ्या गेमपर्यंत गेला. तिसऱ्या गेममध्ये लक्ष्य जराही मागे हटला नाही.त्याने सुरुवातीपासूनच चोयू टिएन चेनला बॅकफूटवर ढकललं. हा गेम लक्ष्यने २१-१२ ने जिंकत सेमिफायनलमध्ये धडक दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT