pakistan cricket team google
Sports

Pakistan Cricket Team: पाकिस्तानी खेळाडूंनी आता महिलांसोबत क्रिकेट खेळावं; दिग्गज खेळाडूने लायकीच काढली

Kamran Akmal On Pakistan Cricket Team: पाकिस्तान संंघाची सुमार कामगिरी पाहता, दिग्गज खेळाडूने जोरदार टीका केली आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तान संघासाठी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा वाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेली नाही. आधी पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप खेळत असलेल्या अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध खेळताना हातचा सामना निसटला. पाकिस्तानच्या या सुमार कामगिरीवर अनेक दिग्गज खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान आता माजी खेळाडू कामरान अकमलने पाकिस्तान संघावर बोचरी टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

गेल्या हंगामात फायनलपर्यंतचा पल्ला गाठणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास यावेळी साखळी फेरीतील सामन्यांमध्येच समाप्त होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानी दिग्गजांनी संताप व्यक्त केला आहे. कामरान अकमलने थेट पाकिस्तानी संघाची लायकीच काढली आहे. त्याने स्पष्टपणे म्हटलंय की, या संघाने जाऊन महिला संघाविरुद्ध खेळावं.

' पाकिस्तान क्रिकेट संघाने पुरुषांविरुद्ध क्रिकेट खेळणं बंद करायला हवं. त्याऐवजी त्यांनी इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांविरुद्ध क्रिकेट खेळावं. पाकिस्तानी क्रिकेटचा दर्जा आता इतका खालावला आहे. काही खेळाडू तर वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याच्या लायकीचेही नाहीत.'

पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतच सुमार कामगिरी करतोय, असं नाही. तर ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका रंगली होती. या मालिकेतील २ सामने पावसामुळे धुतले गेले होते. तर उर्वरीत २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या मालिकेपूर्वी पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका पार पडली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानने कमबॅक करत मालिका खिशात घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

SCROLL FOR NEXT