Shaheen Afridi Gift For Jasprit Bumrah twitter
Sports

Ind vs Pak [WATCH]: मन जिंकलं राव!ज्युनियर बुमराहसाठी आफ्रिदीने पाठवंल खास गिफ्ट;VIDEO व्हायरल

Shaheen Afridi Gift For Jasprit Bumrah: शाहिन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला खास भेट दिली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Shaheen Afridi Gift For Jasprit Bumrah:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील सामना सुरू आहे. कोलंबोच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पावसाचे आगमन झाल्याने हा सामना थांबण्यात आला.

तर पुढील खेळ राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत २ गडी बाद १४७ धावा केल्या आहेत.

दरम्यान हा खेळ संपल्यानंतर पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला खास भेट दिली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

शाहीन आफ्रिदीची बुमराहला खास भेट..

नुकताच बुमराह कुटुंबात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. नेपाळविरूद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह मुंबईत परतला होता.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची पत्नी संजना गणेशनने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

ही बातमी स्वत: बुमराहने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली होती. दरम्यान आता शाहीन आफ्रिदीने देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यासह त्याला खास भेट देखील दिलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाची दमदार सुरूवात..

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत २४.१ षटकात २ गडी बाद १४७ धावाी केल्या आहेत.

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने ५६ तर शुबमन गिलने ५८ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी झाली.

भारत- पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस..

भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ यापूर्वी देखील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये आमने सामने आले होते. या सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावा केल्या होत्या.

मात्र दुसरा डाव सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळेच खबरदारी म्हणून भारत- पाकिस्तान सुपर ४ सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंचा मराठवाड्यातील दुसरा दौरा, उद्धव ठाकरेंनी साधलं 'टायमिंग'?

'Bigg Boss 19'च्या घरात प्रणित मोरेचं कमबॅक? मिळाली मोठी हिंट

Maharashtra Live News Update: - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

SCROLL FOR NEXT