PAK vs SL, Asia Cup 2023 Saam tv
Sports

PAK vs SL, Asia Cup 2023: 'करो या मरो'लढतीत पाकिस्तानचा नाणेफेक जिंकत बँटिंगचा निर्णय;प्लेइंग ११ मध्ये केला मोठा बदल

PAK vs SL,Asia Cup: हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे.

Ankush Dhavre

PAK vs SL, Asia Cup 2023:

आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आला आहे.

पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यातील हा सामना कोलंबोच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. या सामन्यासाठीचा टॉस दुपारी २:३० वाजता होणार होता. मात्र पावसामुळे टॉस ५ वाजता करण्यात आला आहे. पावसामुळे व्यत्यय आल्याने हा सामना ५ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल. तर हा सामना ४५ षटकांचा असणार आहे.

अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत..

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. भारतीय संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. तर श्रीलंकेचा संघ २ गुणांसह दुसऱ्या स्थानी आणि पाकिस्तानचा संघ २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

अशी आहे पाकिस्तान संघाची प्लेइंग ११:

फखर जमान, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि जमान खान.

या सामन्यासाठी अशी आहे श्रीलंकेची प्लेइंग ११:

पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस(विकेटकिपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कर्णधार), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विध्यार्थीना विषबाधा

Akkalkuwa News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेना; पुराच्या पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा

Jasprit Bumrah : लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराहचा जलवा, शतकवीर रूटसह कॅप्टन स्टोक्सही चक्रावला; इंग्लंडच्या अडचणी वाढल्या

Astro Tips For Car: नवीन गाडीची पूजा बायकोकडून का करावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार फायदे

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT