Asia Cup 2025 google
Sports

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

Pakistan Will Boycott Asia Cup 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डने भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. परंतु, आयसीसीने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणात पीसीबीने, १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतील रेफरी पॅनेलमधून काढून टाकण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. परंतु,आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे.

पीसीबीने म्हटले होते की, जर आयसीसीने त्यांची ही अट मान्य केली नाही तर ते आशिया कपवर बहिष्कार टाकतील. यामुळे पाकिस्तानचा आशिया कपमधील प्रवास संपुष्टात येणार का? तसेच, पाकिस्तान आपला पुढील सामना यूएईविरुद्ध खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थितीत होतो.

पाकिस्तान आशियाकपमधून बाहेर पडणार का?

पाकिस्तान स्पर्धेतील पुढील सामना यूएई विरुद्ध खेळणार आहे. १७ सप्टेंबर रोजी हा सामना खेळला जाईल. पीसीबीच्या धमकीनंतर, पाकिस्तान आशिया कपवर बहिष्कार घालणार की नाही यावर अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही. पाकिस्तान आणि यूएई हे दोन्ही संघ आशिया कप २०२५ च्या अ गटामध्ये आहेत. दोन्ही संघांनी दोन सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात पायक्रॉफ्ट पंचाची भूमिका बजावणार आहे. यामुळे पाकिस्तान यूएईविरुद्ध सामना खेळणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जर पाकिस्तानने बहिष्कार घातला तर काय होईल?

पाकिस्तानने १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या युएईविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याची धमकी दिली होती. या सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट हे मॅच रेफरी आहेत हा सामना युएई आणि पाकिस्तान दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट सुपर ४ मध्ये पोहचेल. जर पाकिस्तान संघाने UAE विरुद्ध सामना खेळला नाही आणि आपल्या बहिष्काराच्या निर्णयावर ठाम राहिला तर पाकिस्तान संघाला मोठे नुकसान होईल. दुसरीकडे, यूएई संघ पाकिस्तानविरुद्ध एकही सामना न खेळता सुपर ४ मध्ये प्रवेश करेल, पाकिस्तानच्या वॉकओव्हरमुळे यूएईला २ गुणांचा फायदा होईल. जर पाकिस्तानने यूएईविरुद्ध सामना खेळला नाही तर तो आशिया कप २०२५ स्पर्धेतून थेट बाहेर पडेल.

हस्तांदोलनाचा वाद आणि आयसीसीची फटकार

१४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हस्तांदोलनाचा वाद चांगलाच चर्चेचा विषय बनला. नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमारने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगासोबत हस्तांदोलन केले नाही. सामना संपल्यानंतरही सूर्यकुमार शिवम दुबेसोबत थेट पॅव्हेलियनमध्ये गेला. यावर, पाकिस्तानने भारतीय संघाने खेळभावनेचा उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि १७ सप्टेंबर युएई विरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याची धमकी दिली. यानंतर पीसीबीने अँडी पायक्रॉफ्ट यांना आयसीसीमधून काढून टाकण्याची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT