Pakistan vs Srilanka Weather Update And Match Prediction Saam tv
Sports

Pak vs Sl, Asia Cup 2023: पाकिस्तान - श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोणाला मिळेल फायनलचं तिकीट?

Pakistan vs Srilanka Weather Update And Match Prediction: जर हा सामना पावसामुळे धुतला गेला तर कोणता संघ करेल अंतिम फेरीत प्रवेश?

Ankush Dhavre

Pakistan vs Srilanka Weather Update And Match Prediction:

आशिया चषकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीत भारतीय संघासोबत दोन हात करताना दिसून येईल.सुपर ४ फेरीत दोन्ही संघ भारतीय संघाकडून पराभूत होऊन आले आहेत.

दरम्यान हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर थोडक्यात समजून घ्या सामना रद्द झाल्यास कसं असेल समीकरण.

आशिया चषकात पावसाने थैमान घातल्याचे पाहायला मिळाले आहे. पावसामुळे काही सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही. श्रीलंका- पाकिस्तान सामन्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना देखील रद्द होण्याची चिन्हं दिसत आहेत.

हा सामना जर रद्द झाला तर याचा फायदा श्रीलंकेला होणार आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाल्यास श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. यामागचं कारण असं की, श्रीलंकेचा नेट रनरेट हा पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. गुणतालिकेत भारतीय संघ ४ गुणांसह आघाडीवर आहे. तर श्रीलंका २ गुणांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा संघ २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

सुपर ४ फेरीतील सामन्यात भारत - पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. मात्र या सामन्यासाठी कुठलाही राखीव दिवस नसणार आहे. जो सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत जाईल. तर सामना रद्द झाल्यास भारत आणि श्रीलंकेत आशिया चषकाचा अंतिम सामना होईल. (Latest sports updates)

भारताचा अंतिम फेरीत प्रवेश..

सुपर -४ फेरीत पाकिस्तानी आणि श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात २२८ धावांनी तर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४१ धावांनी विजय मिळवला. आता भारतीय संघासोबत अंतिम फेरीत कोण भिडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

India Alliance Protest: राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला| VIDEO

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

SCROLL FOR NEXT