shaheen afridi twitter
Sports

PAK vs SA: लाईव्ह सामन्यात जोरदार राडा! आफ्रिदीचं हे चुकलं; आधी शिवीगाळ केला अन् मग लाथ मारली -VIDEO

Shaeen Shah Afridi vs Mattew Breetzke Fight Video: दक्षिण आफ्रिका आणि शाहीन आफ्रिदी यांच्यातील सामन्यादरम्यान जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी तरसतोय. याचा परिणाम आता पाकिस्तानच्या खेळाडूंवरही दिसू लागला आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात जोरदार राडा पाहायला मिळाला.

कराचीमध्ये पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजासोबत लाईव्ह सामन्यात वाद केला. त्याला शिवीगाळ केला आणि लाथही मारली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानात आहेत. तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. गोलंदाजी करत असताना शाहीन आफ्रिदीचा संयमाचा बांध फुटला आणि लाईव्ह सामन्यात तो मॅथ्यू ब्रित्जकीला भिडला.

आधी शिवीगाळ अन् मग लाथ मारली

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सुरु असताना २९ वे षटक टाकण्यासाठीा शाहीन आफ्रिदी गोलंदाजीला आला. त्यावेळी ब्रित्जकी फलंदाजी करत होता. आफ्रिदीने टाकलेला चेंडू ब्रित्जकीने खेळून काढला.

जो चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेला. शॉट खेळताच ब्रित्जकीने बॅट मारण्याचा इशारा केला. हे शाहीन आफ्रिदीला आवडलं नाही. शाहीन आफ्रिदी ब्रित्जकीच्या दिशेने गेला आणि त्याला शिवीगाळही केली. ब्रित्जकीनेही त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दोघेही आपल्या ठिकाणी परतले.

पुढच्याच चेंडूवर ब्रित्जकी शॉट मारुन १ धाव घेण्यासाठी धावला. धावत असताना शाहीनने पाय टाकून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. ब्रित्जकी थोडक्यात बचावला. ब्रित्जकीने धाव पूर्ण केली आणि शाहीनला चांगलाच जाब विचारला. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू आणि अंपायर यांनी मद्यस्थी केली आणि हा वाद मिटवला. दरम्यान या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेला ५० षटकअखेर ३५२ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना ३ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र कुठल्याही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VS Airtel: ₹२९९ प्रीपेड प्लॅनमध्ये जास्त डेटा कोण देईल, जिओ की एअरटेल?

8 November 2025 Horoscope: आज द्विग्रह योग होणार, मेष आणि मिथुन राशींसाठी असेल शुभ काळ

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

SCROLL FOR NEXT