Pakistan vs Afghanistan Match Prediction Saam tv news
Sports

PAK vs AFG: चेन्नईत पाकिस्तानचा पराभव निश्चित? अफगाणिस्तान करणार मोठा उलटफेर; वाचा प्रमुख कारण

Pakistan vs Afghanistan Match Prediction: हे दोन्ही संघ चेपॉकच्या मैदानावर आमने सामने येणार आहे.

Ankush Dhavre

Pakistan vs Afghanistan Match Prediction:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ आमने सामने येणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. चेपॉकची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळू शकतो.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा संघ त्याच खेळपट्टीवर आमने सामने येणार आहे ज्या खेळपट्टीवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पार पडला. या सामन्यासाठी भारतीय संघात ३ फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला होता.

या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं होतं. ही खेळपट्टी काळ्या मातीची असल्याने चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त फिरतो.

अफगाणिस्तानचे हे गोलंदाज घालणार धुमाकूळ..

सामना चेपॉकवर होणार आहे, त्यामुळे अफगाणिस्तानच्या फिरकी तिकडीवर मोठी जबाबदारी असणार आहे. अफगाणिस्तान संघातील राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान हे गोलंदाज पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात.

अफगाणिस्तानचं फिरकी गोलंदाजी आक्रमण हे भारतीय फिरकी आक्रमणासह वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फिरकी आक्रमण आहे. तर पाकिस्तानचं फिरकी आक्रमण कमकूवत असल्याचं दिसून येत आहे. (Latest sports updates)

चेन्नईतील हवामान उष्ण असणार आहे. त्यामुळे दुपारची वेळ फलंदाजीसाठी योग्य असू शकते. या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सामना जस जसा पुढे जाईल, खेळपट्टीवर चेंडू फिरण्याचं प्रमाण वाढेल. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते अफगाणिस्तानची प्लेइंग ११ :

रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT