Virat kohli in dubai saam tv
क्रीडा

Virat Kohli : तुझ्या फॉर्मसाठी प्रार्थना करतोय, पाकिस्तानचा 'हा' खेळाडू विराट कोहलीला काय म्हणाला?

आशिया कपमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी विराट कोहली एका संधीची वाट बघत आहे.

नरेश शेंडे

दुबई : भारतीय क्रिकटे संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat kohli) शतकासाठी आणि खराब फॉर्मसाठी झुंझत आहे. आशिया कपमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी विराट कोहली एका संधीची वाट बघत आहे. विराट कोहली सध्या आशिया कप २०२२ (Asia Cup) साठी दुबईत आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्या आधी सरावादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि विराट कोहली यांच्यात चर्चा झाली. यावेळी कोहलीने शाहीनच्या दुखापतीबाबत विचारपूस केली. तसेच शाहीन आफ्रिदीनेही विराटसोबत संवाद साधला.

आफ्रिदीने कोहलीसाठी केली प्रार्थना

विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसोबत याआधी चर्चा केली होती. त्यानंतर विराटने शाहीन आफ्रिदीसोबतही संवाद साधला. यावेळी विराटने शाहीन आफ्रिदीच्या तब्येतीसंदर्भात विचारणा केली. आफ्रिदीने पहिल्यांदा स्वत:बद्दल सांगितलं आणि त्यानंतर विराटशी बोलताना म्हटलं, तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. तुमचा फॉर्म पुन्हा परत येईल. तुम्हाला फॉर्ममध्ये पाहायची इच्छा आहे. यावर कोहली हसत म्हणाला, तुमचं मी धन्यवाद मानतो.

विराट कोहली ४१ दिवसानंतर खेळणार, फॉर्म खूपच खराब

विराट कोहली ४१ दिवसांच्या विश्रांतीनंतर थेट पाकिस्तानच्या विरुद्ध मैदानात उतरणार आहे. विराटने याआधी १७ जुलैला मॅनचेस्टरमध्ये इंग्लंडच्या विरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात विराटने अवघ्या १७ धावा केल्या होत्या. कोहलीने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त ७६ धावा केल्या होत्या. विराटने सर्वात आधी एजबेस्टन टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ११ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २० धावा केल्या होत्या.

त्यानंतर टी-२० मालिकेत दोन सामन्यांत १ आणि ११ धावाच केल्या. त्यानंतर विराट कोहली एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करले,अशी अपेक्षा होती. पंरतु, विराटने निराशाजनक कामगिरी केली. लॉर्डच्या मैदानात एकदिवसीय सामन्यात १६ धावा, त्यानंतर मॅनचेस्टर वनडेत कोहली १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर आता मोठ्या विश्रांतीनंतर विराट पाकिस्तानच्या संघाविरुद्ध झुंज देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT