Asia Cup 2022 : पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचणार विराट कोहली, जाणून घ्या या ५ मोठ्या गोष्टी

शतकापासून दूर असलेला आणि खराब फॉर्मशी झुंजणारा विराट कोहली एका संधीची वाट बघत आहे.
Virat Kohli
Virat Kohlisaam Tv
Published On

मुंबई : बऱ्याच काळापासून शतकापासून दूर असलेला आणि खराब फॉर्मशी झुंजणारा विराट कोहली एका संधीची वाट बघत आहे. आशिया कप स्पर्धेच्या (Asia Cup 2022) माध्यमातून ही संधी त्याच्यासमोर चालून आली आहे. पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड असलेला विराट आता पुन्हा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये काट्याची टक्कर होत आहे. हा सामना रविवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. यात (Virat Kohli) विराट कोहली शतक ठोकणार आणि इतिहासही रचणार अशी आशा टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना आहे.

Virat Kohli
खराब फॉर्मशी झुंजणारा विराट कोहली अखेर बोललाच!; म्हणाला, तर आंतरराष्ट्रीय करिअर...

विराट कोहलीला रनमशीन म्हणून ओळखलं जातं. खोऱ्यानं धावा ओढणारा हा विस्फोटक फलंदाज सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. पण आशिया चषक स्पर्धेत तो यावरही मात करेल, असा विश्वास आहे. त्याच्या बॅटमधून शतक कधी निघेल याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने मागील एक हजार दिवसांपासून शतक केलेले नाही. पाकिस्तानविरुद्ध तो शतकी खेळी करून हा वाईट काळही मागे टाकणार अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानविरुद्ध २८ ऑगस्टला आशिया चषक स्पर्धेत विराट कोहली शतकी खेळी करू शकला नाही तरी, तो इतिहास मात्र रचणार आहे हे निश्चित. कारण पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच तो टी-२० सामन्यांचे शतक नक्कीच ठोकणार आहे.

Virat Kohli
ICC ODI Ranking Latest Update : शुभमन गिलचा धमाका, विराट कोहली कितव्या स्थानी?

१. २८ ऑगस्ट रोजी आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली मैदानात उतरणार आहे. मैदानात उतरताच विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.

२. विराट कोहलीनं सर्वात आधी सामन्यांचे शतक वनडेमध्ये केले होते. ११ जून २०१३ मध्ये तो आपला १०० वा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला होता. हा सामना इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील होता. यात तो वेस्टइंडीजविरुद्ध मैदानात उतरला होता.

३. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दुसरे शतक त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केले होते. ४ मार्च २०२२ रोजी श्रीलंकाविरुद्ध तो मोहालीमध्ये कसोटी सामना खेळला होता.

४. आता ५ महिन्यांनंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आणखी एक शतक पूर्ण करणार आहे. २८ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तानविरुद्ध दुबईत तो मैदानात उतरणार आहे. टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला त्याचा हा १०० वा सामना असेल.

५. विराट कोहलीने आतापर्यंत ९९ टी २० सामन्यांमध्ये ३३०८ धावा केल्या आहेत. त्याची धावांची सरासरी ५० हून अधिक आहे. स्ट्राइक रेट हा १३७.६६ चा आहे. आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीत त्याने अद्याप एकही शतक झळकावलेले नाही. तर ३० अर्धशतके त्याने झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com