NZ vs PAK saam tv
Sports

NZ vs PAK: रचिन आणि विल्यमसनने पाकच्या गोलंदाजांना धुतलं, न्यूझीलंडने पाकिस्तानला दिलं 402 धावांचं आव्हान

NZ vs PAK: रचिन आणि विल्यमसन यांच्या झुंजार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला ४०२ धावांचं आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

NZ vs PAK:

विश्वचषकात सुरू असलेल्या आजच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रचिन आणि विल्यमसन यांच्या झुंजार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला ४०२ धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदा विश्वचषकात मोठं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा संघ डगमगला. पहिल्या दोन षटकात न्यूझीलंडला जास्त काही धावा काढता आल्या नाहीत.

काही षटकानंतर न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढण्यात सुरुवात केली. मात्र, त्याचदरम्यान न्यूझीलंडला ११ व्या षटकात पहिला धक्का बसला. न्यूझीलंडला कॉन्वेच्या रुपाने पहिला झटका बसला. त्यानंतर रचिनने संघाची कमान सांभाळली. रचिनने ५१ धावांत अर्धशतक पूर्ण केलं.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रचिननंतर विल्यमसननेही अर्धशतक साजरं केलं. पुढेही असाच खेळ दाखवत दोघांनी शतकीय भागीदारी रचली. न्यूझीलंडने ३० षटकात २११ धावा पूर्ण केल्या होत्या. रचिनने आपला खेळ कायम राखत विश्वचषकातील तिसरं शतक ठोकलं. रचिनने ८९ चेंडूत शतक पूर्ण केलं. मात्र, त्यानंतर पाकिस्तानला रचिन आणि विल्यमसन यांची जोडी फोडण्यात यश आलं.

विल्यमसन हा ९५ या धावसंख्येवर तंबूत परतला. विल्यमसन बाद झाल्यानंतर रचिनही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. तोपर्यंत न्यूझीलंडने ४१ षटकात तीनशे पार धावा केल्या.

दुसरीकडे न्यूझीलंड संघाची पडझड सुरु असतानाही त्यांच्या ४६ षटकात ३६० धावा कुटल्या. त्यानंतरही न्यूझीलंडच्या संघाने ५० षटकात ४०१ धावांचा डोंगर कुटल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan Fee: इंदुरीकर महाराज एका किर्तनासाठी किती पैसे घेतात?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Pune : मुंब्र्यानंतर पुण्यात छापेमारी, कोंढव्यात एकजण ताब्यात, दहशतवादी जुबेर हंगरगेकरसोबत कनेक्शन

Gavran Style Paneer Chilli Recipe: आजीच्या हातची गावरान स्टाईल पनीर चिली, आता फक्त १० मिनिटांत बनवा, सोपी रेसिपी

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT