England Cricket Team
England Cricket Team Twitter/ @englandcricket
क्रीडा | IPL

PAK vs ENG: मालिकेपुर्वी इंग्लंडचे 7 सदस्य कोरोना पॉझिटीव्ह

साम टिव्ही ब्युरो

पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात ८ जुलैपासून सुरू होणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) असल्याचे आढळले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे.

इंग्लंडच्या पुरुष एकदिवसीय संघातील सात सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर संघाचे इतर सदस्य त्या खेळाडूंच्या संपर्कात आले असल्याचे माहिती समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की- काल (सोमवारी) ब्रिस्टल येथे झालेल्या पीसीआर चाचणीनंतर इंग्लंडच्या पुरुष एकदिवसीय संघातील सात सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती समोर आली आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंड, पब्लिक हेल्थ वेल्स आणि ब्रिस्टल लोकल हेल्थ ऑथॉरिटीच्या सहकार्याने बाधित झालेले सदस्य 4 जुलैपासून विलगीकरणाच्या कालावधीसाठी यूके सरकारच्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करतील. सदस्यांच्या संर्पकात आलेल्यांना आयसोलेट करण्यात येणार आहे. ईसीबीने रॉयल लंडन वनडे सामन्यास दुजोरा दिला आहे आणि पाकिस्तान विरुद्ध महत्त्वपूर्ण टी -20 निर्धारित वेळेनुसार होईल. बेन स्टोक्स इंग्लंडच्या कर्तव्यावर परततेल आणि संघाचा कर्णधार असेल. पुढील काही तासांत या संघाची घोषणा केली जाईल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Gavaskar On Virat Kohli: 'आम्हीही थोडं फार क्रिकेट खेळलोय..' विराटच्या त्या वक्तव्यावर सुनील गावस्कर भडकले

Madness Machayenge : 'बाहुबली ३ मध्ये रोल मिळाला का?'; कालकेयच्या लूकमध्ये अभिनेत्याला पाहून नेटकऱ्याची भन्नाट प्रतिक्रिया

Kadaknath Chicken: कडकनाथ कोंबडी काळी असण्याचं कारण नेमकं काय?

Baramati News: २०१४ मध्ये आपण थोडक्यात वाचलो, जानकर कमळावर लढले असते, तर सुफडा साफ झाला असता, अजित पवारांचं विधान

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

SCROLL FOR NEXT