england cricket team twitter
Sports

WTC Points Table: इंग्लंडकडून पाकिस्तानला बुक्कीत टेंगुळ! WTC Final च्या शर्यतीतून केलं बाहेर; फायनलमध्ये कोण भिडणार?

WTC Final Scenario: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

World Test Championship Points Table: पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानची लाज काढली आहे. घरच्या मैदानावर खेळकाना पाकिस्तानने पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा केल्या.

मात्र तरीदेखील या संघाला १ डाव राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर इंग्लंडचा मोठा फायदा झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालाचा भारतीय संघाच्या रँकिंगवर कुठलाही परिणाम झालेला नाही. मात्र पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ सर्वात शेवटी जाऊन पोहोचला आहे. तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी कायम आहे.

पाकिस्तान संघाची विजयाची सरासरी १६.६७ वर जाऊन पोहोचली आहे. तर पाकिस्तानच्या पराभवाचा फायदा वेस्टइंडीजला झाला आहे. सामना न खेळताच वेस्टइंडीजचा संघ १ पायरी वर चढला आहे. वेस्टइंडीजचा संघ १५.५२० टक्के विजयाच्या सरासरीसह आठव्या स्थानी पोहोचला आहे. तर इंग्लंडचा संघ ४२.१९० टक्क विजयाच्या सरासरीसह चौथ्या स्थानी कायम आहे.

भारतीय संघ अव्वल स्थानी

भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. या सामन्यापूर्वीही भारताचा संघ अव्वल स्थानी कायम होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आणि श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर या संघाची विजयाची सरासरी ७४.२४० टक्के इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६२.५०० टक्के इतकी आहे. श्रीलंकेचा संघ ५५.५६० टक्के विजयाच्या सरासरीसह तिसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT