bangladesh cricket team twitter
क्रीडा

PAK vs BAN 2nd Test: बांगलादेशचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, घरात घुसून २-०ने लोळवलं

Ankush Dhavre

बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून पराभव केला आहे. बांगलादेशचा संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यावरील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.

हा सामना गमावल्यानंतर वाटलं होतं की, पाकिस्तानचा संघ दुसऱ्या सामन्यात कमबॅक करेल. मात्र दुसऱ्या सामन्यातही बांगलादेशने पाकिस्तानला धुळ चारली आहे. यासह २-० ने सुपडा साफ करत मालिका जिंकली आहे.

बांगलादेशने रचला इतिहास

पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्या सामन्यातही ६ गडी राखून विजय मिळवत बांगलादेशने पाकिस्तानचा सुपडा साफ केला आहे. यासह बांगलादेशने इतिहास रचला आहे. बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी पाकिस्तानला ८५.१ षटकात २७४ धावा करता आल्या होत्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूदने ५७, सॅम अयुबने ५८ आणि सलमान अली आगाने ५४ धावांची खेळी केली होती.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला २६२ धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेकडून फलंदाजी करताना लिटन दासने सर्वाधिक १३८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला.

पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या पाकिस्तानला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानचा डाव अवघ्या १७२ धावांवर संपुष्ठात आणला.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १८५ धावांचं आव्हान होतं. या धावांचा पाठलाग करताना झाकीर हुसेनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने सलामीला फलंदाजीला येत ४० धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार शांतोने महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT