BAN vs PAK BAN
क्रीडा

PAK vs BAN 1st Test : पाकिस्तानला घरात घुसून हरवले, रावळपिंडीत बांगलादेशचा १० विकेटनं विजय

Namdeo Kumbhar

Pakistan vs Bangladesh 1st Test : बांगलादेशने रावळपिंडीमध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशने पाकिस्तानचा त्यांच्याच घरी दारुण पराभव केला आहे. पहिला कसोटी सामना बांगलादेशने दहा विकेटने जिंकला आहे. पाकिस्तानने ४४८ धावा करत पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात १४६ धावांवर ऑलआऊट झाले. प्रत्युत्तरदाखळ बांगलादेशने पहिल्या डावात ५६५ आणि दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ३० धावा करत सामना जिंकला. बांगलादेशने पाकिस्तानचा पाकिस्तानमध्येच दहा विकेटने दारुण पराभव केला.

पाकिस्तानचा पाकिस्तानमध्ये १० विकेटने पराभव करणारा बांग्लादेश पहिला संघ ठरला आहे. नजमुल हुसैन शंतोच्या नेतृत्वातील बांग्लादेश संघाने रावळपिंडीमध्ये शानदार कामगिरी केली. रहीम याने बांगालदेशसाठी मॅच विनिंग खेळी केली. त्याने बांगलादेशकडून सर्वाधिक १९१ धावांची खेळी करत सामना फिरवला.

पाकिस्तानकडून धावांचा डोंगर -

पाकिस्तानने रावळपिंडीमध्ये प्रथम फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात 6 विकेट गमावून 448 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर डाव घोषित केला. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतकी खेळी खेळली. रिझवानने 239 चेंडूत नाबाद 171 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. शकीलने 141 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 9 चौकार मारले. सॅम अयुबने 56 धावांचे योगदान दिले. बाबर आझम अपयशी ठरला, त्याला खातेही उघडता आले नाही.

बांगलादेशकडून जोरदार प्रत्युत्तर -

बांगलादेशने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. बांगलादेशने पहिल्या डावात ५६५ पर्यंत धावांचा डोंगर उभरला. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीम याने 191 धावांची खेळी केली. त्याने ३४१ चेंडूचा सामना केला, यामध्ये २२ चौकार आणि एक षटकार ठोकला. सदमन इस्लाम याने 93 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत इस्लामने 12 चौकारांचा पाऊस पाडला. बांगलादेशकडून लिटन दास याने अर्धशतक ठोकले. त्याने 78 चेंडूचा सामना करताना ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. मोमिनुल हक यानेही 50 धावांचे योगदान दिले.

दुसऱ्या डावात १४६ धावांवर पाकिस्तान ढेर -

दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या संघाने लाजीरवाणी कामगिरी केली. मोहम्मद रिझवान याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ५० धावसंख्या ओलांडता आळी नाही. मोहम्मद रिझवान याने ८० चेंडूमध्ये ५१ धावांची खेळी केली. यामद्ये सहा चौकारांचा समावेश होता. सलामी फलंदाज शफीक याने तीन चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. बाबार आझम याला २२ धावांचं योगदान देता आले. बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या.

दहा विकेटने बांग्लादेश जिंकला -

बांगलादेशने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता सामना जिंकला. बांगलादेशकडून झाकीर हसनने नाबाद 15 आणि सदमानने नाबाद 9 धावा केल्या. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT